लोकमान्य टिळक यांना बाळ गंगाधर टिळक म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी यांची १ ऑगस्टला पुण्यतिथी साजरी केली जाते. १ ऑगस्ट १९२० साली त्यांचे निधन झाले. ते एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो. महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले. आजच्या दिवशी जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार जे आपल्या जीवनाची दिशाच बदलून टाकतील.
1. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क (Rights) आहे आणि
तो मी मिळवणारच.
2. एक वेळ राज्य कमावणे सोपे असते,
पण राज्य राखणे कठीण असते.
3. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ (Clean) कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल
गोणपाटा सारखा कराल,
तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल.
4. परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील
तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
5. 'मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने (Education) त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही'
6. 'जुलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे तो परमार्थही नव्हे ती फक्त पशुवृत्ती होय'
7. माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे'
'स्वातंत्र्य म्हणजे विष, स्वराज्य म्हणजे दुध'
8. 'पारतंत्र्यामुळे आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.