Signs of high bad cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High cholesterol: खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यावर चालताना पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या

Signs of high bad cholesterol: लो-डेंसिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरासाठी गंभीर धोका निर्माण होतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये साचते, ज्यामुळे रक्तप्रवाह होत नाही आणि हृदयविकार, स्ट्रोक तसेच पेरिफेरल आर्टरी डिजीज (PAD) सारख्या आजारांचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

लो-डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणजेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणं आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. याला 'वाईट कोलेस्ट्रॉल' असंही म्हणतात कारण ते नसांमध्ये जमा होतं आणि शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण करतं. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि पेरिफेरल आर्टरीचे आजार (पीएडी) सारख्या गंभीर आजारांचा रूग्णांना सामना करावा लागू शकतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्यावेळी शरीरात वाईट म्हणजेच एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते तेव्हा त्याची लक्षणं चालताना किंवा शारीरिक हालचालींदरम्यान दिसून येतात. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष केल्यास ते महागात पडू शकतं.

पेरिफेरल आर्टरी डिसीजमुळे पाय आणि हातांमध्ये रक्तप्रवाह रोखला जातो. यामुळे व्यक्तीला चालताना वेदना, मुंग्या येणं किंवा थंडी वाजण्याची समस्या जाणवू शकते. जर ही समस्या वेळीच हाताळली नाही तर परिस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो. वाढलेल्या एलडीएल कोलेस्ट्रॉलची काही लक्षणं जी चालताना दिसतात ती पाहूयात.

इंटरमिटेंट क्लॉडिकेशन (Intermittent Claudication)

पेरिफेरल आर्टरी डिसीजचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजं इंटरमिटेंट क्लॉडिकेशन. यामध्ये, चालताना किंवा पायऱ्या चढताना व्यक्तीला पायात क्रॅम्प्स येण्याचा धोका जाणवतो. यावेळी स्नायूंमध्ये वेदना जाणवू लागतात. थांबल्यानंतर ही वेदना कमी होतात, परंतु पुन्हा चालताना पुन्हा येऊ शकते.

पायांमध्ये वेदना होणं

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं आणखी एक लक्षण म्हणजे पायांमध्ये वेदना होणं किंवा जडपणा. यावेळी रूग्णाला पोटात, मांडीमध्ये किंवा कंबरेमध्ये वेदना जाणवू शकतात. ही समस्या हळूहळू गंभीर होऊ लागते.

पाय अचानक थंड पडणं

चालताना किंवा शारीरिक हालचाली करताना जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये किंवा घोट्यांमध्ये थंडपणा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे वाईट कोलेस्ट्रॉलमुळे शिरा अरुंद झाल्या असल्याचं लक्षणं आहे. तसंच यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यावेळी पायांचा रंग निळा किंवा पिवळा देखील होऊ शकतो.

मुंग्या येणं

चालताना पायांमध्ये मुंग्या येणं किंवा पाय सुन्न होणं हे देखील एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी शरीरात रक्ताभिसरण योग्यरित्या होत नाही, ज्यामुळे नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा अशी परिस्थिती उद्भवू लागते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT