Baba Vanga Prediction  x
लाईफस्टाईल

Baba Vanga Prediction : 5 जुलैला मोठा विनाश होणार? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, विमान प्रवास रद्द

Baba Vanga : 5 जुलैला महाविनाश होण्याची भविष्यवाणी वर्तवल्यानं अनेकांनी धसका घेतलाय. कोणी हे भाकित वर्तवलंय? आणि त्याचे काय परीणाम होतायेत? पाहूया याबाबतचा एक खास रिपोर्ट...

Girish Nikam

सध्या जगात अस्थिरतेचं वातावरण आहे. भारत-पाकिस्तान, इराण-इस्त्राईल, रशिया-युक्रेन या देशांमधल्या तणावाच्या स्थितीमुळं जगावर तिसऱ्या महाय़ुद्धाची टांगती तलवार आहे. दुसरीकडे कोरोना आणि इतर आजारांच्या संकटाचीही टकटक सुरु आहे. अशा स्थितीतच एका भविष्यवाणीनं जगाची झोप उडाली आहे. 5 जुलैला मोठी आपत्ती येणार आहे. .हे भाकित वर्तवलंय नवीन बाबा वेंगानं...जगाला धडकी भरवणारं हे भाकित वर्तवणारा नवीन बाबा वेंगा आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण 1911 मध्ये बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा या दृष्टीहीन महिलेची भविष्यवाणी जगात प्रसिद्ध आहेत पण ही नवीन बाबा वेंगा आहे जपानमधील मंगा कलाकार रयो तात्सुकी.

तात्सुकीने तिच्या 1999 च्या 'मंगा द फ्युचर आय सॉ' मध्ये एक इशारा दिला होता. 5 जुलै रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली होती. जपान आणि फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळातील भेगा 2011 च्या तोहोकू भूकंपापेक्षा मोठ्या लाटा निर्माण करतील, असं भाकीत आहे. 2030 मध्ये विषाणूंचा मोठा धोका असल्याचा इशाराही दिला आहे. तात्सुकीने यापूर्वी 2011 चा तोहोकू भूकंप, राजकुमारी डायना आणि फ्रेडी मर्क्युरी यांचा मृत्यू या जागतिक घटनांसह कोविड-19 साथीच्या आजाराची भविष्यवाणी केली होती.

आता तात्सुकीच्या 5 जुलैच्या भाकितामुळे हाँगकाँगसह अनेक देशांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. कारण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात हाँगकाँग ते जपान विमान बुकिंगमध्ये 83 टक्के घट झाल्याचे वृत्त आहे. काही जण देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्यानं जपानच्या प्रशासनानं जनतेला घाबरुन न जाण्याचं आवाहन केलंय.

दुसरीकडे भारतातल्या ज्योतिष्य तज्ञांनीही ग्रहांच्या स्थितीनुसार सावधानतेचा इशारा दिलाय. मंगळ, राहू आणि केतू यांचे अशुभ युती आहे. यामुळे देशात आणि जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातही नागरीकांनी 28 जुलैपर्यंतचा काळ संवेदनशील असल्यानं विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय. तर काहि तज्ञांनी शनि आणि मंगळाच्या युतीमुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

एकूणच या वेगवेगळ्या भाकितांमुळे येऊ घातलेला जुलै महिना जगाचं टेन्शन वाढवणारा आहे. मात्र असं असलं तरी या भाकितांवर अवलंबून राहायचं का याचा विचार प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

SCROLL FOR NEXT