Self care tips in marathi, Take care of yourself
Self care tips in marathi, Take care of yourself ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Self care tips : स्वत:ची काळजी घेताना या चुका टाळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलत्या ऋतुमानानुसार आपण आपल्या शरीराची योग्यरित्या काळजी घेतो का? इतरांच्या काळजीत आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत नाही ना हे तपासून पहा. आपल्या शरीरासोबतच मनाचा देखील आपण विचार करायला हवा.

हे देखील पहा -

वाढत्या वयानुसार अनेक महिला स्वतःची योग्य ती काळजी (Care) घेतात. अतिरिक्त पैसे खर्च करून स्पा आणि इतर ब्युटी प्रोडक्टसचा वापर करतात परंतु ते योग्य आहे का? हे जाणून घ्या. या गोष्टी करताना आपल्याकडून इतर अनेक छोट्या छोट्या चुका होत असतात. पैसे व वेळ खर्च करून देखील आपल्याला हवा तो बदल मिळत नाही त्यासाठी स्वतःची काळजी घेताना आपण कोणत्या चुका टाळायला हव्या हे जाणून घेऊ या. (how to care yourself)

या चुका टाळा -

१. सुंदर दिसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी आपण स्पामध्ये जाण्याचा विचार करतो. परंतु, आपण सर्वात आधी आपली महत्त्वाची कामे करायला हवी. कारण स्पामध्ये बराच वेळ (Time) आपला जातो त्यामुळे आपण अशा गोष्टींमध्ये किती गुंतायला हवे हे तपासून पहा.

२. बऱ्याचदा पैसे वाचवून आपण आपल्या त्वचेसाठी किंवा शरीरासाठी काही घरगुती उपायांचा वापर करतो. परंतु, सगळेच घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरणार नाही हे लक्षात असू द्या. (Take care of yourself)

३. दुसऱ्याचा सल्ला घेऊन किंवा सेलिब्रिटीच्या (Celebrity) सेल्फ-केअर रूटीनचे पालन करायला आपल्या अधिक आवडते. पण हे चुकीचे आहे त्यामुळे त्याचा चुकीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यासाठी आपल्या शरीरासाठी योग्य काय आहे हे जाणून घ्या.

४. स्वत: साठी पैसे खर्च करण्यात काही वाईट नाही. परंतु, कॉस्मेटिक किंवा इतर गोष्टींवर आपण किती पैसे खर्च करतोय हे लक्षात घ्या. अतिरिक्त पैसे खर्च केल्याने आपल्याला महिन्याच्या शेवटी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अशाप्रकारे स्वत:ची काळजी घ्या.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT