मुंबई : आपण मुलांना लहानपणापासून अति लाडावून ठेवतो. मुलांच्या हट्टापायी त्यांना हवी ती गोष्ट आपण देतो पण, या सवयीचा परिणाम मुलांच्या वाढत्या वयात दिसून लागतो. ही सवय चांगली वाईट असली तरी त्याचे परिणाम हे पालकांना सहन करावे लागतात (Parenting Tips in Marathi)
हे देखील पहा -
मुलांच्या बुध्दितमत्तेला योग्य दिशा द्यायची असेल तर त्याची सुरवात त्यांच्या लहानपणापासूनच करायला हवी. आपण त्यांच्यावर योग्य वयात संस्कार दिले तर त्यांना गोष्टींची जाणीव होईल. मुलांना योग्य वयात बचत आणि बचतीशी संबंधित गोष्टी शिकवा. बचत आणि खर्च यातला फरक त्यांना समजावून सांगा. बचत कशी करायची त्याचे फायदे काय हेही त्यांना सांगा. मुलांना (Child) बचत करायला कसे शिकवावे हे जाणून घेऊया. (How to teach kids importance of savings)
या टिप्स फॉलो करा -
१. आपल्याला मुलांबद्दल अती काळजी असते. त्यासाठी मुले जी काही गोष्ट आपल्याकडे मागतात आपण त्यांना ते सहज देतो पण, गरज नसताना देखील मुलांची प्रत्येक मागणी पूर्ण करणे योग्य आहे का हे पालकांना (Parents) कळणे गरजेचे आहे. आपल्या मुलांना गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगायला हवा. मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टी खरच गरजेच्या आहे का हे देखील सांगायला विसरु नका.
२. सध्याच्या युगात वाढत्या महागाईच्या काळात आपण मुलांना पैशाच्या किंमती समजावून सांगायला हव्यात. पैसे कमावण्यासाठी आपण किती मेहनत घेतो हे त्यांना पटवून द्या.
३. मुलांना पैसे देताना त्यांना बचतीची देखील सवय लावा. बचतीची सवय लावण्यासाठी पिगी बँक (Bank) हा उत्तम पर्याय ठरु शकतो. मुलांच्या आवडत्या रंगाचे किंवा त्यांच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरची पिगी बँक भेट म्हणून देऊ शकतो.
४. आपल्या घरी येणारे पाहूणे किंवा त्यांना मिळणाऱ्या पॉकेटमनीचा काही भाग पिगी बँकेमधे टाकण्याची सवय लावा त्यामुळे त्यांना पैसे साठवण्याची सवय लागेल.
५. आपण मुलांना बचतीच्या सवयीमुळे होणारे फायदे व बचत का करावी हे सांगायला हवे. दर महिन्याला वाचवले जाणारे पैसे कसे गुंतवायचे हे देखील सांगा. मुलांच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यांना पैसे सेव्ह करायला सांगा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.