Hair Care Tips After Rebonding Treatment  Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips After Rebonding Treatment : रिबॉंडिंग केल्यानंतर 'या' 4 गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा...

Hair care Tips : रिबॉंडिंग केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.

कोमल दामुद्रे

Healthy Hair : केसांच्या सुंदरतेसाठी आपण पार्लर आणि सलूनमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट घेत असतात. खास करून महिलांमध्ये केस रीबॉण्डिंग करणे ही अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे.

अशातच रिबॉंडिंग केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर तुम्ही रीबॉण्डिंग केले असेल तर केसांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ही हेअर ट्रीटमेंट घेतल्यानंतर केस (Hair) अतिशय सुंदर दिसतात. परंतु या ट्रीटमेंट नंतर केस अतिशय सेन्सिटिव्ह बनतात. अशातच काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला हेअर फॉलसारखे अनेक साइड इफेक्ट होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया रिबॉंडिंग केल्यानंतर केसांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी.

1. केस मोकळे सोडा :

ही हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर केसांना तीन दिवस पाण्यापासून लांब ठेवायचे आहे. पाण्याच्या संपर्कात आल्यावर केस कुरळे होतात. ज्यामुळे तुमची ही हेअर ट्रीटमेंट वाया जाऊ शकते. सोबतच रीबॉण्डिंग केल्यानंतर केस कानाच्या मागे, हेअर बँड किंवा क्लिप लागू नये.

Hair Care Tips After Rebonding Treatment

2. उन्हापासून लांब राहा :

ही हेअर ट्रीटमेंट घेतल्यानंतर अतिशय सेन्सिटिव्ह होऊन जातील. त्याचबरोबर तुम्ही वारंवार उन्हामध्ये जात असाल तर, तुमचे केस खराब होऊ शकतील. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केसांवर प्रभाव पडेल. म्हणूनच रीबाउंडिंग केल्यानंतर उन्हामध्ये जाण्यापासून वाचा. सतत घरातून बाहेर निघताना केसांना सिरम लावायला विसरू नका. असं केल्याने तुमची केस सुरक्षित राहतील.

3. केसांची घ्या खास काळजी (Care) :

केलेली हेअर ट्रीटमेंट राहण्यासाठी तुम्ही तुमच्या केसांना तेलाने मसाज करू शकता. सोबतच केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर जरूर लावा. सोबतच तुम्ही महिन्यातून एकदा केसांना हेअर स्पा ट्रीटमेंट देखील करू शकता. याशिवाय एलोवेरा जेल, ऑलिव्ह ऑइल, अंड आणि दह्याचे हेअर मास्क लावून तुम्ही तुमचे केस हेल्दी बनवू शकता.

4. गरम पाण्याने केस धुवून नये :

रिबांडिंग केल्यानंतर केसांना कोमट किंवा गरम पाण्याने अजिबात धुवू नये. त्यामुळे केसांमधील मॉइश्चरायझर संपते आणि तुमचे केस पुन्हा पहिल्यासारखे कुरळे होऊन जातात. म्हणूनच हेअर वॉश करण्यासाठी नॉर्मल पाण्याचा (Water) वापर करणे फायद्याचे ठरेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT