Sleep In Office Saam TV
लाईफस्टाईल

Sleep In Office : कामाचा डोंगर असूनही ऑफिसमध्ये झोप येते; मग या 'टिप्स'ने फ्रेश वाटेल

Ruchika Jadhav

तुम्ही सर्वजण जर ९ किंवा १० च्या शिफ्टला म्हणजेच जनरल शिफ्टमध्ये काम करत असाल तर नक्कीच तुम्ही सकाळी ६ किंवा ७ वाजता उठत असाल. घर ऑफिसपासून लांब असल्यास त्या व्यक्तींना ऑफिसला पोहचवण्यासाठी पहाटे ५ वाजता देखील उठावे लागते. एवढ्या सकाळी उठल्यावर ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक झोप येते. आता ही झोप थांबवणं फार कठीण होतं.

डोक्यावर कामाचा डोंगर असूनही काहींना जबरदस्त झोप येते. अशा झोपेमुळे आपले नकळत ऑफिसमध्ये बॅड इंप्रेशन पडते. ऑफिसमधील सर्व व्यक्ती आपल्याला आळशी समजू लागतात. त्यामुळे ऑफिसमध्ये येणारा आळस दूर करण्यासाठी काही सिंपल टिप्स जाणून घेऊ.

रात्री लवकर झोपा

रात्री लवकर झोपल्यावर पहाटे लवकर उठता येतं. त्याने आपली झोपही पूर्ण होते. त्यामुळे ऑफिसमध्ये मूड फ्रेश राहतो. ऑफिसमध्ये झोप येऊनये यासाठी तुम्ही देखील रात्री लवकर झोपा. यामुळे ऑफिसमध्ये झोप लागत नाही, तसेच आपल्या कामावरही त्याचा परिणाम होतो.

पौष्टिक आहार निवडा

कामाच्यावेळी सकाळी नाश्त्यामध्ये जंक फूड खाऊनका. फक्त पौष्टिक आहार घ्या. आहारात फळे, भाज्या आणि सूप या गोष्टी खा. तेलकट आणि जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने देखील आपल्याला आळस येतो आणि झोप वाढू लागते. झोपेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिभेवरही नियंत्रण ठेवा.

पोटभर पाणी प्या

आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तेव्हा देखील आपल्याला झोप येते. आपल्याला डोकेदुखी आणि विकनेस देखील येतो. त्यामुळे झोप घ्यावी वाटते. त्यामुळे कामात कितीही व्यस्त असलात तरी देखील पोटभर पाणी प्या. किमान आर्धा आर्धा तासाने पाणी प्या.

चहा किंवा कॉफी

झोपेवर रामबाण उपाय म्हणजे चहा किंवा कॉफी. कॉफीमध्ये कॅफेन असतं, कॅफेन आपला आळस आणि झोप कमी करण्यासाठी काम करतं. त्यामुळे प्रत्येक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्याने मन लावून कामे करावे यासाठी टी ब्रेकची सोय असते.

खाली एक फेरी मारा

बराचवेळ एकाच जागी बसून काम केल्याने आपल्या शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे आपल्याला झोप येते. झोप जास्त येत असेल तर ऑफिस खाली जाऊन एक फेरी मारून या. त्याने तुम्हाला फ्रेश वाटेल. शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होईल आणि तुम्हाला आलेली झोप देखील निघून जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT