Mental health yandex
लाईफस्टाईल

Mental Health : सतत नकारात्मक विचार येतात का? मानसिक आरोग्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mental Health tips: आजूबाजूचे वातावरण, माणसांची वागणूक आणि जीवनात सतत बदलणारी परिस्थिती यामुळे नकारात्मक विचार येऊ लागतात. परंतु हे नकारात्मक विचार एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मानसशास्त्रज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती जीवनातील सत्य स्वीकारण्यास असमर्थ असतो ज्यामुळे तो नकारात्मकतेकडे वाटचाल करू लागतो. नकारात्मक विचार असलेली व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ लागते, एकटे राहण्यास सुरुवात करते, स्वतःची इतरांशी तुलना करते आणि स्वतःची काळजी घेणे देखील थांबवते. यामुळे ती व्यक्ती मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडते. नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याचा मार्ग जाणून घेऊया.

नकारात्मक विचारांपासून मुक्त कसे व्हावे

समाधानी राहायला शिका

प्रत्येक व्यक्तीचे जीवन एकमेकांपेक्षा वेगळे असते. साहजिकच त्याचे सुख-दु:खही दुसऱ्या माणसापेक्षा वेगळे असतात. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. याशिवाय स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. 

परिपूर्णतेच्या मागे धावणे थांबवा

अनेक वेळा एखादी व्यक्ती एखादे काम परिपूर्ण करण्यात आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ वाया घालवू लागते. त्यामुळे एकीकडे अपराधीपणा तर दुसरीकडे नकारात्मकता मनात वाढू लागते.  त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

इतरांच्या विचारांना तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका

कुटुंब, नातेवाईक किंवा मित्रांच्या म्हणण्यानुसार जीवन जगणे थांबवा आणि स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. इतर लोकांच्या विचारधारा आणि दृष्टिकोनांचा तुमच्यावर प्रभाव होऊ देऊ नका. त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या इच्छेनुसार आयुष्य जगा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेणे टाळा. 

स्वतःची इतरांशी तुलना करू नका

तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल समाधानी राहा. स्वतःची इतरांशी तुलना करताना माणसाचे मन नकारात्मक विचारांनी वळते. स्वतः च्या गरजांवर लक्ष केंद्रित करा आणि इतरांची कॉपी करू नका.

स्वतःवर प्रेम करायला शिका

स्वतःची काळजी घ्या. रोज व्यायाम करा, वेळेवर झोपा, सकस आहार घ्या, प्रियजनांसोबत वेळ घालवा.

नकारात्मक लोकांपासून दूर राहा

जेव्हा आपण नकारात्मक लोकांच्या जवळ असतो तेव्हा इच्छा नसतानाही नकारात्मक विचार आपल्या मनात डोकावू लागतात. त्यामुळे अशा लोकांसोबत राहू नका.

तुमच्या क्षमतेनुसार उद्दिष्टे ठरवा

अनेक वेळा एखाद्याच्या क्षमतेपेक्षा जास्त उद्दिष्टे ठेवली तर ती पूर्ण करता येत नाहीत.  अशा परिस्थितीत नकारात्मकता टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT