Diabetes Diet SAAM TV
लाईफस्टाईल

Diabetes Diet : डायबिटीज रुग्णांनी 'हा' सुकामेवा खाणे टाळा, अन्यथा वाढेल रक्तातील साखर अन् येईल हार्ट अटॅक

Dry Fruits : ड्रायफ्रुट्स आरोग्यासाठी पोषक असतात. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी काही ड्रायफ्रुट्स खाणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

Shreya Maskar

बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेक आजार उद्भवतात. त्यातील एक सामान्य आजार म्हणजे डायबिटीज. आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढत जात आहे. त्यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी डॉक्टर सुद्धा सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. मात्र डायबिटीजच्या रुग्णांनी काही ड्रायफ्रुट्स खाणे टाळावे. कारण यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

अनेक ड्रायफ्रुट्समध्ये नैसर्गिक साखर कंसंट्रेटेड फॉर्ममध्ये आणि कार्बोहाइड्रेटचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वेगाने वाढते. मधुमेहाच्या लोकांनी पोषक आहारासोबत नियमित व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे. कारण शारीरिक हालचाल गरजेची आहे.

मनुका

डायबिटीज रुग्णांनी चुकूनही मनुका खाऊ नये. कारण मनुक्यामध्ये इतर ड्रायफ्रूट्स पेक्षा जास्त प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवून मधुमेहाचा धोका उद्भवतो. मनुका वजन कमी करण्यासाठी मनुका फायदेशीर आहे.

खजूर

खजूर खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांना नैसर्गिक गोडवा मिळतो. मात्र त्यातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढत असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

अंजीर

कोरडे अंजीर मध्ये कंसंट्रेटेड फॉर्म घटक असल्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढते.

क्रॅनबेरी

मूत्राशयाच्या अनेक समस्यांवर क्रॅनबेरी रामबाण उपाय आहे. पण सुका क्रॅनबेरीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हे खाणे टाळावे.

जर्दाळू

सुक्या जर्दाळूमध्ये जास्त प्रमाणात साखरेचे प्रमाण असते. ज्यामुळे टाईप २च्या मधुमेहाचा धोका वाढतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते ड्रायफ्रूट्स खावे?

  • बदाम

  • अक्रोड

  • पिस्ता

  • काजू

या ड्रायफ्रूट्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. तसेच यात जास्त कॅलरीज नसतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT