Chetan Bodke
आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी सुकामेव्याची आवश्यकता असते.
शरीराला आवश्यक ते घटक न मिळाल्यास आपल्याला काही आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीर उत्तम आणि सदृढ ठेवण्यासाठी अनेकजण रोजच्या आहारात सुकामेव्याचा समावेश करतात.
मनुक्यांमध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट, आयरन, मॅग्निशियम, फॉस्फरस, व्हिटामिन्स, प्रोटीन आणि पोटॅशियम सारखे महत्वाचे घटक असतात.
मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा स्वच्छ आणि चमकदार ठेवते.
शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्यांनी रोज सकाळी उपाशीपोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील आयरनचे प्रमाण वाढते.
रोज सकाळी ५ ते १० मनुक्यांचे सेवन केल्याने वजन आटोक्यात राहते आणि रक्तातील वाढती शुगर नियंत्रणात राहते.
मनुकामध्ये बोरॉन आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यात मदत करतात.
मनुक्याचे सेवन केल्याने आपले डोळे उत्तम राहतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.