Marriage Astrology Saam TV
लाईफस्टाईल

Marriage Astrology : लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी आजपासून 'हा' उपाय सुरू करा; महिन्याच्या आत आनंदाची बातमी मिळेल

Astrology Tips for Marriage : लग्न न जुळण्याची अनेक विविध कारणे असू शकतात. त्यामुळे आज लग्न जुळत नसलेल्या व्यक्तीसाठी आम्ही ज्योतिषशास्त्रातील काही उपाय शोधले आहेत.

Ruchika Jadhav

लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जीवनातला म्हतवचा टप्पा मानला जातो. अनेक व्यक्ती वयाची तिशी गाठतात मात्र तरीही त्यांचं लग्न जुळत नाही. काहीवेळा समोरच्या व्यक्ती नकार देतात. तर काहीवेळा आलेलं स्थळ चांगलं वाटत नाही त्यामुळे लग्न जुळत नाही. लग्न न जुळण्याची अनेक विविध कारणे असू शकतात. त्यामुळे आज लग्न जुळत नसलेल्या व्यक्तीसाठी आम्ही ज्योतिषशास्त्रातील काही उपाय शोधले आहेत.

लोखंडी टाळा

ज्या व्यक्तींचे लग्न ठरत नाही किंवा जुळून आलेल्या गोष्टी काही ना काही कारणाने मोडतात त्या व्यक्तींसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय दिला आहे. त्यातील एक उपाय म्हणजे लोखंडी टाळा. ज्या व्यक्तीचे लग्न ठरत नाही त्यांनी झोपताना उशीखाली लोखंडी टाळा ठेवावा. त्याने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते.

हळद

वय वाढत आहे मात्र लग्न जुळत नाही अशा समस्या असल्यास त्या व्यक्तीने आपल्या अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिक्स करावी. हळद विविध आजारावर गुणकारी आहे. त्यासह ज्योिषशास्त्रात देखील हळदीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे लग्नाचा योग जुळून येण्यास मदत होते.

गाईला नैवेद्य

लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी गायीला नैवेद्य द्यावा. गुरुवारी गव्हाचे पीठ त्यात गूळ, चण्याची डाळ आणि हळद टाका. हे मिश्रण छान पाण्याने मिक्स करा आणि गाईला खाण्यासाठी द्या. गाय म्हणजे मातृत्व. गाईत 33 कोटी देव आहेत असं ही म्हटलं जातं.

लग्न घरात कामात मदत

ज्या व्यक्तीचे लग्न जुळत नाही त्यांनी इतरांच्या लग्नात जावे. घरी जाऊन त्यांना कामात मदत करावी. असे केल्याने देखील त्या व्यक्तीचे लग्न जुळण्यासाठी मोठी मदत होते.

सुगंधी द्रव्य

आपलं मन प्रसन्न असल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात असं म्हणतात. त्यामुळे त्यासाठी तुम्ही रोज सुगंधी द्रव्य म्हणजे सेंट किंवा अत्तर वापरण्यास सुरुवात करा. याने तुमच्याकडे असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल.

टीप : ही सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail : मोठी बातमी! येत्या शनिवारपासून मोनोरेल ट्रेनसेवा बंद राहणार, कारण?

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Fact-Check: महिलांचं STतील हाफ तिकीट बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Kalakand Recipe : नवरात्रीत बनवा स्पेशल कलाकंद मिठाई, एक घास खाताच पाहुणे होतील खुश

SCROLL FOR NEXT