Pandharpur Vitthal Wari : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल... या नावाने विठुचा गजर करत सारे वारकरी आपल्या विठ्ठलाच्या भेटीस निघतात. वारी म्हणजे वारकरी तर विठ्ठलाच्या भेटीला वारकऱ्याचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी असे म्हटले जाते.
पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा सर्वात मोठा सणच जणू... या सणात फक्त हरिनामाचा गजर, मुखी विठूरायाचे नाम व अपार अशी भक्ती. आषाढ महिना सुरु झाली की, भक्तांना ओढ लागते ती विठुरायाची. गळ्यात मृदुंग, टाळ व डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन अनेक पालख्या व वारकारी पंढरपूरास प्रस्थान करतात.
'ग्यानबा तुकाराम', 'पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल' चा गजर करत आपल्या देवाचे दर्शन (darshan) घेण्यासाठी प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतो. पंढरीचा पांडुरंग अनेकाच श्रद्धास्थान. हिंदू पंचागानुसार (Hindu Panchag) आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी अर्थातच देवशयनी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी (Aashadi ekadashi) ही गुरुवारी, २९ जून २०२३ रोजी येत आहे. ही एकादशी वारकरी सांप्रदायांसाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा असतो.
ही पंढरीची वारी हजारो हजारो वर्षापासून अविरत सुरू आहे आणि ती पुढेही तशीच सुरु राहील. पण वारी म्हणजे काय ? त्याचे महत्त्व काय ? ती पहिल्यांदा कुणी सुरु केली जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
1. पंढरपूरची वारी म्हणजे काय ?
'पंढरीची वारी करी वारकरी उन्ह पावसाची चिंता कोण करी' असे म्हणत लाखो भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघतात. वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या (Vitthal) भेटीसाठी पंढरपूरला अनवाणी पायाने चालत जातात.
तसेच वारकऱ्यांच्या या संपूर्ण समूहाला दिंडी म्हणून ओळखले जाते. गावोगावोतून निघालेल्या दिंड्या आषाढ शुक्ल पक्षातील दशमीला एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्तगण आपल्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघतात. तेथे पोहचल्यानंतर चंद्रभागेच्या नदीत स्नान करुन प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल चा जयघोष पंढरपूरात दुमदुमतो.
2. पंढरपूरची वारीचा इतिहास
पंढरपूरची वारी ही अनेक वर्षांपासून सुरु आहे. जणू वारकऱ्यासाठी ही एक परंपराच बनली आहे. ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात. असे म्हटले जाते की, १६८५ साली तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा यांनी पालखीची ओळख करुन देण्यासाठी दिंडी काढली.
संत तुकारामाच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि दिंडी घेऊन ते आळंदीला निघाले. नंतर त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या तेव्हा पासून वारीची सुरूवात झाली. परंतु काही कारणांमुळे वाद झाले या जुळया पालखीची परंपरा खंडित करुन आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची व देहूहून संत तुकारामांची पालखी निघते. दरवर्षी सुमारे ४३ पालख्या पंढरपूराला प्रस्थान करतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.