Shreya Maskar
कोल्हापुरची झणझणीत मिसळ जगात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला गेल्यावर तेथील मिसळ-पाव आवर्जून खा.
कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, हळद, मीठ, धने, जिरे, लवंगा, काळी मिरी, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कांदा, आलं-लसूण मसाला, लाल तिखट, बेसन इत्यादी साहित्य लागते.
कुकरमध्ये मोड आलेली मटकी, हळद आणि मीठ घालून शिजवून घ्या. तुम्ही कुकरला २-३ शिट्ट्या काढून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून फोडणी बनवा. यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून चांगले परतून घ्या.
त्यानंतर कांदा, आलं-लसूण मसाला घालून तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. तुम्ही यात स्पेशल कोल्हापुरी मसाला देखील टाकू शकता.
यात शिजलेली मटकी, बेसन दोन्ही पदार्थ मिक्स करा आणि एक उकळी काढून घ्या. यात तुमच्या आवडीचे काही पदार्थ टाका.
शेवटी फरसाण, कांदा आणि कोथिंबीर घालून गरमागरम मिसळचा आस्वाद घ्या. तुम्ही वरून छान लिंबू देखील पिळा.
गरमागरम पाव आणि खमंग कोल्हापुरी मिसळ नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही एक कप चहासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.