कोमल दामुद्रे
हिंदू धर्मात वेगवेगळ्या पानांचा वापर पूजेसाठी केला जातो.
यामध्ये तुळस, वड, पिंपळ यांसारख्या झाड्यांना विशेष महत्त्व दिले जाते.
असे म्हटले जाते की, केळीच्या झाडाची पूजा ही विशेषत: गुरुवारी केली जाते.
या दिवशी भगवान विष्णुला अधिक महत्त्व असते. जाणून घेऊया धार्मिक महत्त्व
अशी मान्यता आहे की, केळीचे झाड हे शुभ असते. यामध्ये भगवान विष्णुचा वास असतो.
तसेच याला गृहप्रवेश, सत्यनारायणाची पूजा व इतर अनेक धार्मिक कार्यात पूजनीय मानले जाते.
तसेच दक्षिण भारतीयांच्या जेवणाच्या थाळीत विशेषत: केळीच्या पानांचा वापर केला जातो.
याचा वापर गणपतीमध्ये नैवेद्यासाठी देखील केला जातो.