Ashadhi Ekadashi 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; होइल मोठं नुकसान

Ruchika Jadhav

आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. विविध ठिकाणी या एकादशीला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. या दिवशी सर्वच भक्त श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात. देवाकडून सुख, शांती आणि समृद्धीचा आशिर्वाद मिळावा यासाठी या दिवशी मोठी पुजा केली जाते. यंदा आषाढी एकादशी १७ जुलै रोजी आली आहे.

आषाढी एकादशीला घरात प्रत्येक व्यक्तीचा उपवास असतो. हे एक पवित्र व्रत असल्याचं मानलं जातं. आषाढी एकादशीला अध्यात्मीक आणि धार्मिक महत्व आहे. सुखी आयुष्यासाठी या दिवशी कडक उपवास केला जातो आणि देवाची मनोभावे आराधना केली जाते. आषाढी एकादशीला काही गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका.

एकादशीला काय करावे आणि काय करू नये?

तुळशीची पाने

आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. कारण या दिवशी तुलसी देवी श्री हरीसाठी उपवास करते. त्यामुळे पुजेसाठी या दिवशी तुम्हाला तुळशीची पाने लागत असतील तर आदल्या दिवशीच ती तोडून ठेवा.

तामसीक आहार

ज्या व्यक्ती आषाढी एकादशीचा उपवास पकडतात त्यांच्या मनात आदल्या दिवशीच जास्त जेवण करावं असे विचार येतात. मात्र अशा पद्धतीने तामसीक आहार म्हणजे तेलकट, तिखट, मांस असा आहार करणे चूक आहे. त्याने आरोग्यासह तुमच्या खिशावर सुद्धा वाईट परिणाम झालेला दिसेल.

तांदळाचे सेवन

ज्या व्यक्तीचा उपवास आहे त्यांनी उपवासाच्या पदार्थात तांदळाचे सेवन करू नये. काही व्यक्ती तांदळाच्या पापड्या किंवा त्याची पेज खातात. मात्र आषाढी एकादशीला हा आहार चुकीचा आहे.

मंत्र जप

देवाची मनोभावे पुजा करताना त्यासोबत आषाढी एकादशीच्या दिवशी सतत देवाच्या नावाचे नामस्मरण करत राहा. त्याने सुद्धा तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदत राहिल.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आषाढी एकादशीबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

SCROLL FOR NEXT