ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मानुसार उपवास आणि व्रताला खुप महत्तव असतं.
उपवास केल्यामुळे आपल्याला देवी-देवतांचा आशिर्वाद प्राप्त होतो.
मात्र अनेकवेळा चुकून आपल्याकडून व्रताच्या दिवशी उपवास मोडतो. उपवास तुटल्यावर त्वरीत या गोष्टी करा.
चुकून उपवास मोडल्यावर घाबरून जायचं नाही लगेच देवासमोर आपल्या चुकीची कबुली द्यायची.
चुकून उपवास मोडला तर तुमच्या देवघरात देवाच्या मुर्तीची स्थापना करून पंचामृताने देवाला स्नान घालून त्यांची पूजा करा.
चुकून उपवास मोडला तर मंदीराबाहेर किंवा रसत्यावरील लोकांना अन्नदान करा.
चुकून उपवास मोडला तर तुमच्या जवळील श्वानाला किंवा गायीला नैवेद्य खायला घाला.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही