Deep Amavasya 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Deep Amavasya 2023 : दीप अमावस्या कधी आहे? जाणून घ्या तिथी, महत्त्व व पूजा पद्धत

Deep Amavasya 2023 Date : आषाढ अमावस्या 17 जुलै रोजी आहे. याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट म्हणतात

कोमल दामुद्रे

Ashadh Deep Amavasya : आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्याही आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जाते. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.

यावर्षी आषाढ अमावस्या 17 जुलै रोजी आहे. याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.

या अमावास्येला (Amavasya) पितरांसाठी यज्ञ आणि दान केल्याने पुण्य मिळते असे म्हटले जाते. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या (Shravan) स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते

1. दीप अमावस्या कधी असते?

पंचांगानुसार अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू होणार आहे. पण सूर्योदयामुळे ती 17 जुलै रोजी साजरा केली जाणार आहे. 17 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजता अमावस्या तिथी समाप्त होईल. आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाणार आहे. म्हणूनच ही अमावस्या विशेष आहे.

2. दीप अमावस्या कशी साजरी करावी?

दीप अमावस्येच्या दिवशी घरात (Home) ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने जाळले जातात. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

TB cases Maharashtra: पुणे, नाशिक ते कोल्हापूर, नागपूरसह ११ हजार गावात टीबीचा विळखा, काय काळजी घ्याल? वाचा लक्षणं

Homemade Hair Mask Tips: उन्हामुळे केस कोरडे पडलेत? 'हे' 3 होममेड हेअर मास्क लावा, सिल्की आणि शायनी होतील तुमचे केस

Famous Actor : मृत्यूपूर्वी बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारने 388 कोटींचा चित्रपट दिला, एकेकाळी अभियन सोडून गेले होते ओशोंकडे

दिवस उजाडताच विमानाचा भीषण अपघात; क्षणात उडाला आगीचा भडका, पायलटसह सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT