Artist Meetup saam tv
लाईफस्टाईल

यशवंत...गुणवंत...! हजारो चित्रकार घडवणाऱ्या महाविद्यालयात आर्टिस्ट मीट-अप, महिलादिनी सन्मान

यशवंत कला महाविद्यालयामध्ये एक आठवडा आर्टिस्ट मीट - अप हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंटरनॅशनल चित्रकारांची प्रात्यक्षिके व स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन तसेच करिअर गाईडन्स प्रोग्राम चे आयोजन केले होते.

Surabhi Jayashree Jagdish

यशवंत कला महाविद्यालयामध्ये एक आठवडा आर्टिस्ट मीट - अप हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंटरनॅशनल चित्रकारांची प्रात्यक्षिके व स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन तसेच करिअर गाईडन्स प्रोग्राम चे आयोजन केले होते. यामध्ये चित्रकार पंडित खैरनार, चित्रकार शाइन शिवण, चित्रकार पिसुर्वो, चित्रकार महेश करंबेले, मुद्रा चित्रकार अंकिता दौलताबादकर, चित्रकार मनाली शेतवडेकर, सचिन भुयेकर यांचा समावेश होता.

साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीच्या, यशवंत कला महाविद्यालयामार्फत कॅम्पचं आयोजन करण्यात आलं. या कॅम्पमध्ये देशातून विवीध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून ३० चित्रकारांनी सहभाग घेतला. या कॅम्प ची सुरुवात आणि कलाकारांचा सन्मान दिनांक ०८  मार्च २०२५ रोजी होणार आहे व हा कॅम्प दोन दिवस सुरू असणार आहे. या सर्व कार्यक्रमाचं आयोजन यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र तोरवने व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग यांनी केले. तसंच छत्रपती संभाजी नगर शहरातील सर्व कला महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होते.

यशवंत कला महाविद्यालयाची स्थापना १९६० ची आहे. मराठवाड्यातील हे पहिले कला शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. या संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब बेडसे यांनी या महाविद्यालयाची स्थापना केली. गरीब, आदिवासी पाड्यातील मुले यांना काल शिक्षण घेता यावे व अजिंठा-वेरूळ या सारखा कला वारसा असलेल्या मराठवाड्यात कलेच संगोपन व वारसा पुढे चालू ठेवण्याचा हा त्यांचा दुर दृष्टीकोन होता. एकदम कमी दरात मुलं याठिकाणी शिक्षण घेतात. आजपर्यंत हजारो कलाशिक्षक आणि चित्रकर तसंच शिल्पकार या महाविद्यालयाने घडवलेत.

आप्पा साहेब यांचा मूल्यशिक्षण व शिस्त याचे संस्कार शिक्षक तसेच विद्यार्थ्यांवर केले. व आजतागायत ते संस्कार व शिस्त प्राचार्य तसेच प्राध्यापक यांच्या माध्यमातून निरंतर चालू आहे. संस्थेच्या या कॅम्पस मद्ये कला व क्रिडा या दोनच गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे.

आजपर्यंत अनेक नावीन्यपूर्ण तसेच सामाजिक सेवेसाठी हे महविद्यालय पारंगत आहे. महाराष्ट्रातील पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स या महाविद्यालयाने घेतली आहे. तसेच विद्यार्थी व चित्रकार यासाठी कलादालन या सुसज्ज अश्या आर्ट गॅलरी ची निःशुल्क चित्रप्रदर्शन भरवण्यास सर्वांसाठी खुली आहे.

संस्थेचे आजचे अध्यक्ष दादासाहेब परागजी बेडसे , सेक्रेटरी भैय्यासाहेब अनिलजी सोनवणे, तसेच संस्थेचे विश्वस्त मंडळ यांच्या मार्गदर्शना खाली महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र तोरवणे हे निस्वार्थ भावनेने सर्व नावीन्यपूर्ण उपक्रम निरंतर व अखंडपणे चालवत आहेत. या महाविद्यालयात कलाउत्सव, बाल कलाउत्सव तसेच विविध स्पर्धा, कार्यशाळा, प्रात्यक्षिके यांचे आयोजन अखंडपणे चालू आहे. दृश्यकला क्षेत्रात एक नवी चळवळ उभारण्याचे कार्य या महाविद्यालया मार्फत केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT