Smartphone Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Smartphone Side Effects : सावधान ! तुमचं मुलंही सतत स्मार्टफोन पाहतात ? जडू शकतो मायोपियासारखा गंभीर आजार

Myopia Disease : अगदी मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलचा वापर करतात.

डाॅ. माधव सावरगावे

Child Care Tips : सध्याच्या डिजिटल दुनियेत मोबाईल हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अगदी मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलचा वापर करतात.

गेम खेळण्यासाठी किंवा कार्टुन पाहण्यासाठी लहान मुलं (Child) मोबाईल सर्रास वापर करतात. परंतु, तुम्हाला माहितीये का? मोबाईलच्या अती वापरामुळे लहान मुलांना आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. मोबाईलचा (Smartphone) जास्त वापर लहान मुलांच्या डोळ्यांसाठी घातक ठरत असल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे.

डॉ. मनोज सासवडे, नेत्ररोग तज्ज्ञ म्हणतात लहान मुलं स्क्रिनच्या अगदी जवळून मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे त्यांना मायोपिया सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मायोपिया या आजारांमध्ये (Disease), मुलांच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार वाढल्यानं प्रतिमा रेटिनापेक्षा थोडी पुढे तयार होते. त्यामुळे दुरचे वस्तू पाहण्यास अडचण होते. अनेक संशोधनांमधून असं समोर आलं आहे की, छोटी डिजिटल स्क्रिन ही डोळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. अशातच ज्या लहान मुलांना चष्मा आहे, त्यांचा नंबर खूप लवकर वाढतो.

1. मायोपियाची लक्षणं नेमकी काय?

सतत डोळ्यांची उघडझाप होणं, दुरवरचं न दिसणं, पाहण्यात किंवा अक्षर वाचतान अडचण येणं, डोकं दुखणं, डोळ्यांत पाणी येणं, पाहताना पापणीवर ताण येणं, पुस्कांमधील अक्षरं ठळक न दिसणं यासारखी लक्षणं मायोपिया या आजारात दिसून येतात.

2. कशी घ्याल मुलांची काळजी

  • ज्या ठिकाणी लहान मुलं अभ्यासाला बसतात, त्या ठिकाणी व्यवस्थित उजेड किंवा प्रकाश पडतोय की नाही ते पाहा.

  • मुलांच्या हातात मोबाईल कमी द्यावा. अभ्यासासाठी जर डिजिटल स्क्रिन लागत असेल तर मोबाईल ऐवजी लॅपटॉप द्यावा

  • मुलांना 'जीवनसत्त्व अ' असलेलं पौष्टिक पदार्थ द्यावेत. जर तुमच्या मुलांनासुद्धा वरील लक्षणं दिसत असतील तर आताच सावध व्हा आणि आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

ST Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, आता बंजारा समाजाला हवे, STमधून आरक्षण

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

SCROLL FOR NEXT