back pain driving doctor advice saam tv
लाईफस्टाईल

Back Pain: दररोज गाडी चालवताना पाठदुखीचा त्रास होतोय? डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्यावी काळजी?

back pain driving doctor advice: दररोज गाडी चालवणाऱ्या अनेकांना पाठदुखीची समस्या भेडसावते. चुकीचे आसन, सततचा ताण आणि लांब वेळ बसून राहणे ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल रोजचा प्रवास, ऑफिसला जाणं-येणं किंवा लांब ड्रायव्हिंग टाळणं जवळजवळ अशक्य झालंय. पण या सततच्या ड्रायव्हिंगचा शरीरावर खासकरून पाठीच्या कण्यावर गंभीर परिणाम होताना दिसतो. अनेक स्पाईन क्लिनिकमध्ये कंबरदुखी, माकडहाड दुखणं आणि मान आखडणं अशा तक्रारी अनेकांमध्ये दिसतात. दीर्घकाळ गाडी चालवणं हे या त्रासामागील एक महत्त्वाचं आहे.

जसलोक हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. अमित शर्मा यांनी सांगितलं की, ड्रायव्हिंग करताना शरीर बराच वेळ एकाच स्थितीत स्थिर राहतं. यामुळे हालचाल कमी होते आणि रस्त्यांवरील खड्डे, धक्के यांचा थेट परिणाम मणक्यावर होतो. ज्यांना आधीपासून स्लिप डिस्क, सायटिका किंवा स्नायू ताठर होण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा ताण अधिक धोकादायक ठरू शकतो.

वाहन चालवताना पाठदुखी का वाढते?

दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये बसल्याने मणक्यांवर सतत दबाव राहतो आणि स्नायूंमध्ये कडकपणा निर्माण होतो. बसण्याची चुकीची पद्धत जसं वाकून बसणं किंवा पुढे वाकून स्टेअरिंग पकडणं यामुळे कंबर आणि मानेवर अतिरिक्त ताण येतो. खराब रस्ते, खड्डे आणि वारंवार बसणारे धक्के यामुळे मणक्यांना छोट्या इजा होऊ शकतात. हालचाल कमी झाल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे पूर्णपणे निरोगी व्यक्तीलाही लांब ड्रायव्हिंगनंतर पाठदुखी जाणवू शकते.

ड्रायव्हिंग करताना योग्य बसण्याची पद्धत

गाडीत बसताना मागच्या खिशात ठेवलेली पर्स किंवा मोबाईल काढून ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण त्याने कंबरेचा तोल बिघडतो. स्टेअरिंगपासून योग्य अंतर ठेवावं आणि पुढे वाकून बसणं टाळावं. सीट साधारण १०० ते ११० अंश मागे असावी. कंबरेला आधार मिळेल अशी सीट ठेवा.

सीट सपोर्टचं महत्त्व

लांब प्रवासासाठी शक्यतो आरामदायक सीट असलेली गाडी निवडावी. गाडीचं शॉक अॅब्झॉर्बर आणि टायर्स चांगल्या स्थितीत आहेत का, हे तपासणं आवश्यक आहे. अचानक ब्रेक मारणं आणि अतिशय खराब रस्त्यावरून वेगाने प्रवास करणं टाळावं. सीट कुशन किंवा बॅक सपोर्ट वापरल्यास पाठीवरील ताण कमी होतो. दर दीड ते दोन तासांनी थांबून पाच ते दहा मिनिटे विश्रांती घेणं, गाडीतून उतरून थोडं चालणं आणि हलके स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे.

प्रवासात हालचाल का गरजेची?

ड्रायव्हिंगदरम्यान दर १५–२० मिनिटांनी बसण्याची स्थिती थोडी बदलावी. लहान हालचालींमुळे रक्तप्रवाह सुधारतो. बराच वेळ अगदी एकाच स्थितीत बसून राहणे टाळणे गरजेचे आहे.

गाडी चालवताना काय काळजी घेतली पाहिजे?

  • ड्रायव्हिंगची जबाबदारी वाटून घ्या

  • पायांची योग्य पोझिशन आहे की नाही याची काळजी घ्या

  • मानसिक थकवा टाळा

  • नियमित व्यायाम करा

  • आधीपासून पाठदुखी असल्यास घ्यायची काळजी

  • वेदना सुरू झाल्यास दुर्लक्ष करू नका

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पाठदुखी काही दिवसांपेक्षा जास्त टिकत असल्यास, पाय किंवा हातात सतत वेदना जाणवत असल्यास, सुन्नपणा, मुंग्या किंवा अशक्तपणा वाटत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अवकाळीचा पुणे शहराला तडाखा, १४ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना

Karvanda Chutney Recipe: गावरान स्टाईल आंबट- गोड करवंदाची चटणी कशी बनवायची?

Weight Loss Recipe : चटपटीत 'इडली'ला बनवा हेल्दी, फक्त टाका 'हा' एक पदार्थ, झपाट्याने वजन होईल कमी

Explainer: लहान उद्योजकांसाठी खास टिप्स, हा नवा कसा गेम चेंजर ठरणार? वाचा सविस्तर

LPG Cylinders: गॅस सिलिंडरच्या नियमात पुन्हा बदल होणार, केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT