Social media workouts saam tv
लाईफस्टाईल

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Spine injury: सोशल मीडियावरील व्हायरल फिटनेस चॅलेंज, जड वजन आणि हाय-इंटेन्सिटी वर्कआउट करताना मणक्याला दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. डेडलिफ्ट, स्क्वॅट्ससह व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी आणि कोणती लक्षणे गंभीर मानावीत, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

हल्ली सोशल मीडियावरील व्हायरल फिटनेस चॅलेंजेस आणि इन्फ्लुएन्सर्सकडून येणारे वर्कआउट व्हिडिओज तरुणाईला आकर्षित करतात. अवघड व्यायाम, जड वजन उचलणे आणि हाय-इंटेन्सिटी वर्कआउट पाहून अनेकजण तसाच व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, योग्य प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन नसताना असे व्यायाम करणे मणक्याची गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

बॉम्बे स्पाईन क्लिनिकचे सर्जन डॉ. सिद्धार्थ काटकडे यांनी सांगितलं की, सोशल मीडियावरील फिटनेस ट्रेंड्समध्ये जड वजन उचलणं, उंच उड्या मारणं आणि शरीरावर अधिक ताण देणारे व्यायामाचे व्हिडिओ, रिल्स तयार केल्या जातात. हे व्यायाम करण्यासाठी ताकद, लवचिकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य तंत्र आवश्यक असते. मात्र, अनेकजण कोणतीही तयारी किंवा मार्गदर्शन न घेता व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मणक्यावर अनावश्यक ताण येऊन दुखापत होण्याचा धोका वाढतो.

विशेषतः डेडलिफ्ट, स्क्वॅट्स, ओव्हरहेड प्रेस आणि एक्सप्लोसिव्ह जंप्स यांसारखे व्यायाम चुकीच्या पद्धतीने किंवा क्षमतेपेक्षा अधिक वजनासह केल्यास मणक्यावरील स्नायू, लिगामेंट्स आणि डिस्कवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी, स्लिप डिस्क, डिस्कसंबंधी दुखापत किंवा मज्जातंतूंवर दाब येण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशा दुखापतींमुळे दैनंदिन कामं करणंही कठीण होऊ शकतं.

डॉ. काटकडे यांनी सांगितलं की, व्यायामानंतर सतत पाठदुखी किंवा मानदुखी जाणवणं, हात-पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं, स्नायूंमध्ये कमजोरी जाणवणं, उभं राहणं किंवा चालताना अडचण येणं तसंच लघवी किंवा शौचावर नियंत्रण कमी होणं ही गंभीर लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने स्पाईन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मणका सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • व्यायाम सुरू करण्यापूर्वी योग्य प्रकारे वॉर्म-अप करा.

  • कोणताही नवीन किंवा अवघड व्यायाम करण्यापूर्वी प्रशिक्षित फिटनेस ट्रेनरकडून योग्य तंत्र शिकून घ्या.

  • क्षमतेनुसारच वजन वाढवा; इतरांची नक्कल करू नका.

  • व्यायाम करताना योग्य पोश्चर कायम ठेवा.

  • प्रत्येक वर्कआउटनंतर शरीराला पुरेशी विश्रांती द्या.

  • दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • व्यायामानंतर स्नायूंच्या पुरेशी विश्रांती मिळावी दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या.

फिटनेस महत्त्वाचा असला तरी सोशल मीडियावरील प्रत्येक ट्रेंड आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. त्यामुळे कोणताही व्हायरल फिटनेस ट्रेंड फॉलो करण्याऐवजी स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच व्यायाम करणं गरजेचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT