Monsoon Vegetables To Eat: पावसाळ्यात 'या' 5 भाज्या ठेवतील पोट साफ; अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रासही होणार नाही

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे पचनाशी संबंधित समस्या आणि भाज्यांमध्ये बुरशीचा धोका वाढू शकतो. भोपळा, दुधी भोपळा, दोडका, सुरण आणि पडवळ यांसारख्या हंगामी भाज्यांचा आहारात समावेश का करावा, जाणून घ्या.
Monsoon Vegetables To Eat
Monsoon Vegetables To Eatsaam tv
Published On

पावसाळा सुरू झाला की वातावरणात आर्द्रता वाढते. याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवरही होऊ शकतो. या काळात पचनाशी संबंधित समस्या वाढण्यासोबतच अनेक हंगामी आजारांचा धोकाही वाढतो. बाजारात मिळणाऱ्या काही भाज्यांनाही पावसाळ्यातील ओलाव्यामुळे बुरशी किंवा कीड लागू शकते. अशा भाज्या खाल्ल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता असते.

त्यामुळे पावसाळ्यात भाज्यांची निवड करताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत मान्सूनमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या ५ भाज्यांबद्दल माहिती दिलीये. या भाज्या कोणत्या आहेत ते पाहूयात.

Monsoon Vegetables To Eat
High blood pressure: मधुमेह आणि हायपरटेन्शन बनतंय साइलेंट किलर, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

भोपळा

पावसाळ्यात भोपळ्याची भाजी खाऊ शकता. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत होते. भोपळ्याचं सूप किंवा भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा आहारात समावेश करता येतो.

दुधी भोपळा

दुधी भोपळा म्हणजेच लौकी हीदेखील पावसाळ्यात खाण्यासाठी चांगली भाजी मानली जाते. पचनसंस्थेसाठी तिचे अनेक फायदे आहेत. दुधी भोपळा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास आणि आतड्यांचं आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात ही भाजी आहारात ठेवता येते.

दोडका

दोडका ही पावसाळ्यात खाता येणाऱ्या फायदेशीर हिरव्या भाज्यांपैकी एक आहे. दोडक्यामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असल्याने शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेलाही तो मदत करू शकतो. दोडक्याची भाजी, सूप किंवा चटणी अशा विविध प्रकारे तो खाता येतो.

सुरण

सुरणाची भाजीही पावसाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सुरणामध्ये भरपूर फायबर असतं. तसंच त्यात विविध खनिजेही चांगल्या प्रमाणात असतात. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुरळीत राहण्यास आणि बाऊल मूव्हमेंट म्हणजेच शौचास होण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.

Monsoon Vegetables To Eat
Diabetes: टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीज यांच्यात काय आहे फरक? कोणता प्रकार जास्त धोकादायक?

पडवळ

पडवळाची भाजी तुम्ही पावसाळ्यात खाऊ शकता. पावसाळ्यात होणारी अॅसिडिटी आणि पोट फुगणं म्हणजेच ब्लोटिंग यांसारख्या पचनाशी संबंधित त्रासांपासून दूर राहण्यासाठी पडवळाचा आहारात समावेश करता येतो.

सिझनप्रमाणे भाज्या खाणं फायदेशीर

पोटाचं आरोग्य चांगले ठेवायचं असेल आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर कोणत्याही ऋतूमध्ये त्या सिझनमध्ये उपलब्ध होणाऱ्या भाज्यांना आहारात स्थान देणं फायदेशीर ठरतं. हंगामी भाज्यांमुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुरळीत ठेवता येते.

Monsoon Vegetables To Eat
Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com