Sugar Control google
लाईफस्टाईल

Diabetes Symptoms: सतत भूक लागते अन् थकवाही जाणवतोय? ही लक्षणे असू शकतात डायबिटीजची

Sugar Control: डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. सतत भूक लागणे, थकवा, जखमा उशिरा भरून येणे, वारंवार लघवी इ. संकेत दिसल्यास तातडीने तपासणी करावी.

Sakshi Sunil Jadhav

डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे ओळखल्यास वेळेत नियंत्रण शक्य आहे.

सतत भूक, थकवा, वारंवार लघवी होणे हे प्रमुख संकेत आहेत.

वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास धोका कमी होतो.

डायबिटीज म्हणजे रक्तातील ग्लुकोज किंवा साखरेची पातळी जास्त होणे. याचे प्रमाण हे स्वादुपिंड पॅनक्रियाज पुरेशी इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीर तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हाच वाढते. ही स्थिती कोणत्याही वयोगटातील लोकांवर परिणाम करू शकते. बहुतांश प्रकारचे डायबिटीज आयुष्यभर टिकतात, पण औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवता येते. पुढे आपण डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते, काही सुरुवातीचे संकेत असे असतात जे डायबिटीजचा धोका वाढत असल्याचे दर्शवतात. त्यामध्ये पुढील लक्षणांचा समावेश असतो.

१. सतत भूक लागणे

शरीरात इन्सुलिन कमी प्रमाणात तयार झाल्याने ग्लुकोज योग्यरीत्या शोषले जात नाही आणि पेशींना आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्तीला सतत भूक व तहान लागल्यासारखे वाटते.

२. जखमा उशिरा भरून येणे

कापणे, खरचटणे किंवा इजा झाल्यानंतर जखम भरून यायला खूप वेळ लागत असेल, तर हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि शरीराच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो.

३. सतत थकवा येणे

शरीर ग्लुकोज योग्यरीत्या शोषू शकत नसल्यास आवश्यक ऊर्जा मिळत नाही आणि व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. कोणत्याही कारणाशिवाय थकवा किंवा कमजोरी जाणवत असल्यास, हे डायबिटीजचे लक्षण असू शकते.

४. वारंवार संसर्ग होणे

डायबिटीजमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे वारंवार ताप, सर्दी, श्वसनाचे आजार किंवा मूत्रमार्गातील संसर्ग होऊ शकतो.

५. वारंवार लघवी होणे

रक्तातील साखर वाढल्यावर किडनीला ती गाळण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे वारंवार लघवी होते, विशेषतः रात्रीच्या वेळी. हे डायबिटीजचे अत्यंत सामान्य लक्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पारदर्शी एसआयटी नेमावी: सुप्रिया सुळे

त्वचेवर दिसून येतात युरीक एसिडचे धोकादायक संकेत, वेळीच ओळखा

EPF Account: EPF खात्यातील या चुका वेळीच टाळा, अन्यथा दर महिन्याचे फंड कमी होतील

Jalgaon-Mumbai Flight: आनंदाची बातमी! आता जळगाववरून दीड तासात मुंबई गाठा; जाणून घ्या विमान उड्डाणांचे वेळापत्रक

निंबाळकरांचा काहीच संबंध नाही, डॉक्टर भगिनीला न्याय देणारच; फलटणमध्ये फडणवीसांचा विरोधाकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT