Water Heater  Saam Tv
लाईफस्टाईल

Water Heater : तुम्ही सुद्धा घरासाठी नवीन वॉटर हीटर घेताय ? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा !

नवीन वॉटर हीटर घेण्याचा विचार करतो अशा वेळेस काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे

कोमल दामुद्रे

Water Heater Tips: सध्या पूर्ण भारतामध्ये थंडी पडत आहे.गरम कपडे , स्वेटर,मफलर,कॅप या सर्वांची खरेदी करून आपण थंडी पासून आपला बचाव करतो. तसेच या काळात वॉटर हीटर चा उपयोग जास्ती प्रमाणात वाढतो तर उन्हाळ्यात कमी वापर करतो त्यामुळे बरेच वॉटर हीटर खराब होतात.

अशावेळी आपण स्वतः बनवण्याचा प्रयत्न करतो, नाही बनला तर आपण बाहेर दुकानदाराला देऊन येतो आणि मग काही दिवसांनी पुन्हा वॉटर हीटर बदलण्याची वेळ येते. नवीन वॉटर हीटर घेण्याचा विचार करतो अशा वेळेस काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे चला तर जाणून घेऊया त्याबद्दल

1. कॅपॅसिटी

वॉटर हीटरची साईझ निवडताना विचार करूनच साईझ निवडा कारण जर कमी क्षमतेचा हीटर घेतला तर नंतर त्रास नको. त्यामुळे तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा कमी पाणी गरम होत आहे म्हणून अनेक समस्या येतात. जर तुम्ही स्वयंपाक घरासाठी हीटर घेत असाल तर १लिटर, ३लिटर आणि ६ लिटरच खरेदी (Shopping) करू शकता, बाथरूमसाठी १० लिटर ते ३६ लिटर आणि शॉवरसाठी ६० लिटर.

2. सेफ्टी

पाणी आणि लाईट दोन विरुद्ध गोष्टी सोबत येतात त्यामुळे सेफ्टी खूप महत्वाची आहे. वॉटर हीटर मध्ये खास सेफ्टी फीचर्स असल्या हवेच लिकेज झाल्यावर लाईटीचा पुरवठा बंद होणे इत्यादी सुविधा त्यात असायला पाहिजे.

Water Heater

3. नवीन टेक्नॉलॉजी

वॉटर हीटरची ऊर्जा कार्यक्षमता निर्धारित करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे त्याचे एनर्जी स्टार रेटिंग पाहणे. रेटिंग जितके जास्त असेल तितके डिव्हाइस विजेची बचत करण्यास सक्षम असेल. इंडक्शन वॉटर हीटर्स हे नवीन पिढीचे तंत्रज्ञान (Technology) हीटर्स आहेत जे पाणी गरम करण्यासाठी चुंबकीय इंडक्शन प्रक्रियेचा वापर करतात. हे तंत्रज्ञान त्वरीत पाणी (Water) गरम करते, ज्यामुळे वीज वापर कमी होतो.

4. डिझायनर

आजकाल बहुतेक घरांमध्ये (Home) अंतर्गत सजावट महत्वाची भूमिका बजावते, हे लक्षात घेऊन असे वॉटर हीटर घेणे चांगले आहे जे आपल्या घराचे सौंदर्य वाढवू शकेल, ज्याची रचना आधुनिक आणि आकर्षक आहे.

5. विक्रीनंतर सेवा

कोणतेही उत्पादन किंवा ब्रँड निवडण्यापूर्वी, त्यांची विक्री-पश्चात सेवा उपलब्धता आणि उत्पादनाच्या वॉरंटी अटींबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वॉटर हीटरवर दीर्घकाळ वॉरंटी देणारा आणि विक्रीनंतरची सेवा त्रासमुक्त करण्यास सक्षम असलेला ब्रँड निवडा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT