Mobile Screen Guard : तुमच्या फोनला Tempered Glass असूनही त्याची स्क्रीन का तुटते ?

स्मार्टफोन विकत घेतल्यावर सर्वात आधी आपण बॅक कव्हर,स्क्रीनगार्ड घेऊन फोनला प्रोटेक्ट करतो.
Mobile Screen Guard
Mobile Screen GuardSaam Tv

Mobile Screen Guard : आताच्या काळात फोन आपण सर्वच वापरतो. आपल्या मुलासारखी फोनची काळजी आपण घेतो असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्मार्टफोन विकत घेतल्यावर सर्वात आधी आपण बॅक कव्हर,स्क्रीनगार्ड घेऊन फोनला प्रोटेक्ट करतो.

स्क्रीनगार्ड असल्यामुळे आपल्याला असे वाटते की, आपला फोन सेफ आहे पण बऱ्याचदा ते असून सुद्धा आपल्या फोनची स्क्रीन तुटते. काही लोक १०० रुपयांचे स्क्रीन गार्ड वापरतात ते फक्त फोनच्या स्क्रीनला स्क्रॅच येण्यापासून वाचवत असते.

Mobile Screen Guard
Best Mobile Phone : हे आहेत 'या' वर्षातील 5 बेस्ट फोन, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सही दमदार !

हातातून फोन खाली पडल्यावर डिस्प्ले सहज तुटतो त्यामुळे जे महागडे Tempered Glass असतात त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शनस असतात ज्यामुळे आपला फोन जास्ती सेफ असण्याची शक्यता असते. मार्केटमध्ये वेगवेगळ्या फोनच्या ब्रँडनुसार Tempered Glass उपलब्ध आहेत त्यामुळे त्याच्या ब्रँडनुसार किंमत ठरत असते.स्क्रीन कार्ड ५० रुपया पासून ते १००० रुपयांपर्यंत मिळते.चला तर मग जाणून घेऊया Tempered Glass बदल संपुर्ण माहिती.

1. स्क्रीन का तुटते?

जर तुम्हाला तुमच्या फोनच्या स्क्रीनला स्क्रॅच येण्यापासून प्रोटेक्ट करायचे असेल तर स्वस्त स्क्रीन कार्ड वापर उत्तम आहे पण त्यामुळे तुमच्या फोनचा डिस्प्ले सेफ असेलच असे नाही.जाड स्क्रीन कार्ड असल्यामुळे फोनच्या स्क्रीन आणि फोनच्या कव्हर मधील गॅप नाहीसा होतो त्यामुळे फोन पडल्यानंतर फोनचा डिस्प्ले लगेच तुटतो.

Tempered Glass किंमत ५०रुपयांपासून ते पुढे वाढत जाते. ऑनलाईन (Online) शॉपिंग (Shopping) स्टोअर amazon, filpkart या साइड वर Tempered Glass ची किंमत २०००रुपयांपर्यंत आहे जे बाजारात मिळणाऱ्या Tempered Glass पेक्षा तुलनेने कितीतरी पट कमी आहे

Mobile Screen Guard
Mobile Screen Guardcanva

2. महाग मिळणाऱ्या स्क्रीन गार्ड बदल

दोन प्रकारचे स्क्रीन गार्ड मार्केट (Market) मध्ये मिळतात त्यातला एक प्लास्टिक पासून बनवलेले असतात.आणि दुसरा काचेपासून बनवलेले असतात.स्क्रीन गार्ड तुमच्या फोनच्या ब्रँडनुसार डीझाईन केलेले असतात त्यामुळे तुमचा फोन सुरक्षित राहतो पण त्याची किंमत २००० रुपये असते पण एवढी किंमत घेण्याचे कारण तरी नक्की काय ? हे गार्ड बनवताना चांगल्या तंत्राचा वापर करून गार्डला अशाप्रकारे बनवता की, फोन जरी खाली पडला तरी फोनच्या (Phone) डिस्प्लेवर प्रेशर येत नाही आणि फोनचा डिस्प्ले तुटण्याची श्यकता फार कमी असते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com