1941 and 2025 calendar same saam tv
लाईफस्टाईल

History repeating itself : १९४१ मध्ये घडलं तेच यंदा घडतंय? ८४ वर्षांपूर्वीचं कॅलेंडर व्हायरल

1941 and 2025 calendar same : सध्या सोशल मीडियावर एक चर्चा खूप व्हायरल होत आहे, ती म्हणजे २०२५ चे कॅलेंडर हे हुबेहूब १९४१ च्या कॅलेंडरसारखे आहे. केवळ कॅलेंडरच नाही, तर त्या दोन वर्षांतील जागतिक घडामोडींमध्येही काही प्रमाणात समानता आढळत असल्याचा दावा केला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकदा एखादी घटना सारखी घडली की आपण त्याला सहजपणे योगायोग घडला असं म्हणतो. या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये भारतात अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि आता अहमदाबाद विमान दुर्घटना. या सर्व घडामोडींमध्ये आता १९४१ या वर्षाची चर्चा होऊ लागलीये. यामध्ये २०२५ हे वर्ष 1941 सारखंअसल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.

सध्या जगात इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू झालंय. नुकतंच भारत आणि पाकिस्तान यांच्यात हल्ले झालेत आणि त्याच वेळी १९४१ साली जग दुसऱ्या महायुद्धातून जात होतं. याच वर्षी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि दुसरे महायुद्ध सुरू झालं.

हा केवळ इथल्या घडामोडींचा विषय नाही, तर तो तारीख आणि दिवसाचाही आहे. २०२५ चे कॅलेंडर हे १९४१ च्या कॅलेंडरसारखेच आहे. त्या वर्षी ज्या तारखेला दिवस होता तीच तारीख यंदा ही आहे. दोन्ही वर्षे बुधवारपासून सुरू झाली असून दोन्ही लीप इयर नाहीत.

2025 आणि 1941 चे कॅलेंडर पूर्णपणे एकमेकांशी जुळतात. दोन्ही वर्षांत प्रत्येक तारीख एकाच आठवड्याच्या दिवशी येते. परंतु मॅट्रिक्समध्ये ही एकवेळची त्रुटी नाही. कारण ते ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार आहे.

1941 मध्ये त्यावेळी काय झालं होतं?

२७ मे १९४१ रोजी ब्रिटिश नौदलाने फ्रान्सजवळील उत्तर अटलांटिकमध्ये जर्मन युद्धनौका बिस्मार्क बुडवली होती. या घटनेत दोन हजारांपेक्षा जास्त जर्मन सैनिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या हल्ल्याचा संबंध अहमदाबाद विमान दुर्घटनेशी जोडला जातो. याशिवाय २६ जुलै १९४१ रोजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी फ्रेंच इंडो-चीनवरील जपानी कब्जाचा बदला म्हणून अमेरिकेतील सर्व जपानी मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या.

१९४१ मध्ये नाझी जर्मनीने सोव्हिएत युनियनवर आक्रमण करताना ऑपरेशन बार्बारोसा सुरू केलं होतं. यावेळी जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिकेला युद्धात सामील होण्यास भाग पाडलं. युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडात त्यावेळी मोठी युध्यजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्याच वर्षी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत बुडाली. त्या वर्षाच्या अखेरीस जग पूर्णपणे युद्धात बुडाले होते.

१९४१ प्रमाणे २०२५ हे वर्ष पाहिलं तर यावर्षी रशिया-युक्रेन संघर्ष जगाने पाहिला आहे. याशिवाय भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवस लष्करी संघर्ष झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला गाझा आणि दक्षिण लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध झालेलं. आता सध्याच्या घडीला इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या अनेक हल्ल्यांनंतर शस्त्रसंधी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT