
धक्कादायक भाकितांसाठी बल्गेरियाचे बाबा वेंगा हे खूप प्रसिद्ध आहेत. अशातच जपानमध्येही एका भविष्यवाणीची चर्चा आहे. ही भविष्यवाणी जपानचे प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकी यांनी केली आहे. काही लोक रियो तात्सुकीला न्यू बाबा वांगा असंही म्हटलं जातं. त्यांच्या कॉमिक पुस्तक "द फ्युचर आय सॉ" मध्ये तात्सुकी यांनी ५ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये मोठ्या आपत्तीची भविष्यवाणी केली आहे.
सोशल मीडियावर न्यू बाबा वांगा यांच्या या इशाऱ्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम जपानमध्ये येणाऱ्या पर्यटकांवरही दिसून येतो. जपानमध्ये येणारे लोक त्यांचे प्रवास रद्द करत असल्याचं पाहायला मिळतंय.
काही तज्ज्ञांच्या सांगण्यांनुसार, ही अंधश्रद्धा आहे. मात्र असं असंल तरी काही लोक ते हलके घेऊ शकत नाहीत. यापूर्वी रिओ तात्सुकी यांनी २०११ मध्ये भूकंप आणि त्सुनामीची अचूक भविष्यवाणी केली होती. यामुळे देखील लोक या भाकिताकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
जपानी मंगा कलाकार रियो तात्सुकी यांनी त्यांना पडलेल्या स्वप्नांद्वारे भाकीतं केली आहेत. ते त्यांच्या कॉमिक्समध्ये या गोष्टी सादर करतात. रियो तात्सुकी यांनी त्यांच्या 'द फ्युचर आय सॉ' या ग्राफिक पुस्तकाच्या २०२१ च्या आवृत्तीत लिहिलंय की, ५ जुलै २०२५ रोजी जपानमध्ये एक मोठी आपत्ती येणार आहे.
रियो तात्सुकी यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. ज्यामुळे लोक या भाकितावरून गंभीर झाले आहेत. लोक सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचं अंदाज लावत असून काही भूकंपांबद्दल बोलतायत तर काही सायबर हल्ल्यांची भीती व्यक्त करतायत. ब्लूमबर्ग आणि व्हाइस सारख्या मीडिया रिपोर्ट्समुळे हा मुद्दा आता मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलाय.
मियागीचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी पत्रकार परिषदेत अलिकडच्या भाकितांबद्दल चिंता व्यक्त केलीये. ते म्हणाले की, जर सोशल मीडियावरील अफवांमुळे पर्यटनावर परिणाम होत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे. त्यांनी लोकांना आवाहन केलंय की, घाबरण्याची गरज नाही.
१९९५ चा कोबे भूकंप- र्यो तात्सुकीने या विनाशकारी भूकंपाचा अंदाज आधीच वर्तवला होता. त्यामुळे त्यांचा अंदाज गांभीर्याने घेतला गेला.
२०११ तोहोकू भूकंप आणि त्सुनामी- त्यांनी या विनाशकारी आपत्तीचीही भविष्यवाणी केली होती, ज्यामध्ये अंदाजे २२,००० लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
कोरोना- द फ्युचर आय सॉ यामध्ये २०२० मध्ये एका जीवघेण्या व्हायरसचा प्रसार दाखवण्यात आला होता, जो कोविड-१९ शी जोडला गेला होता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.