Burning Sensation in Feet saam tv
लाईफस्टाईल

Burning Feet: पायांच्या तळव्यांमध्ये सतत जळजळ होतेय का? 'या' गंभीर आजारांचे संकेत असू शकतात

Burning Sensation in Feet: पायामंध्ये आग किंवा जळजळ होण्याचा त्रास तुम्हालाही होतो का? जर तुम्हालाही हा त्रास होत असून तुम्ही याकडे दुर्लक्ष करत असाल तर हे तुम्हाला महागात पडू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

अनेकदा कोणत्याही कारणास्तव आपल्या पायामध्ये आगआग होऊ लागते. यावेळी आपण लगेच पाय दाबतो किंवा बाम लागतो. सतत ही समस्या जाणवत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्षही करतो. जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध व्हा. कारण तुम्हाला माहितीये का, ही समस्या कोणा गंभीर आजाराचं संकेत असू शकतं.

पायांच्या तळव्यामध्ये जळजळ होणं, हलकं टोचल्यासारखणं वाटणं किंवा तीव्र वेदना जाणवू शकतात. यामुळे तुम्हाला दैनंदिन कामं करणंही कठीण होऊन बसतं. जर यावर वेळीच उपचार केले नाही तर ही समस्या वाढू शकते. मुळात पायाच्या तळव्यांमध्ये अनेक कारणांमुळे जळजळ होऊ शकते. जसं की, ब्लड सर्कुलेशन योग्य पद्धतीने न होणं, नर्व डॅमेज होणं, जीवनसत्त्वांची कमी किंवा कोणत्या वैद्यकीय कारणांमुळे हा त्रास उद्भवू शकतो.

पायांच्या तळव्यांमध्ये जळजळ होण्याची कारणं

मज्जातंतू डॅमेज

जेव्हा शरीरातील मज्जातंतूमध्ये बिघाड होतो तेव्हा पायामध्ये जळजळ होण्याची समस्या दिसून येते. डायबेटीक न्यूरोपॅथी हे या समस्येचं एक प्रमुख कारण आहे. ज्यावेळी शुगर लेवल जास्त असते तेव्हा नसांना नुकसान होतं. परिणामी पायांमध्ये जळजळ, सुन्नपणा येऊ शकते.

फंगल इंफेक्शन

त्वचेच्या इन्फेक्शनमुळे जळजळ होऊ शकते. त्वचेच्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला घाम येऊ शकतो. अशावेळी जेव्हा तुम्ही मोजे घालता तेव्हा फंगलची वाढ होते. अशात खाज येणं आणि जळजण होण्याचा त्रास होतो.

दीर्घकाळ उभं राहणं

जर तुम्ही थकला असाल किंवा जास्त वेळ उभे असाल तरीही पायांमध्ये जळजळ होऊ शकते. दिवसभर उभं राहिल्याने किंवा जास्त वेळ चालल्याने तसंच चुकीच्या मापाचे शूज वापरल्याने पायांमध्ये ब्लड सर्कु्लेशन योग्य पद्धतीने होत नाही. ज्यामुळे पायांमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते.

जीवनसत्त्वांची कमतरता

व्हिटॅमीन्सची कमी असल्यास पायांमध्ये जळजळ होऊ शकते. बी१२ व्हिटॅमीनच्या कमतरतेने नसांवर परिणाम होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिला; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT