Surabhi Jayashree Jagdish
चहा आणि कॉफी हा आपल्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे.
परंतु तुम्हाला माहितीये का चहा आणि कॉफी बनवून ठेवल्यानंतर किती वेळाच्या आत प्यायला पाहिजे?
जेव्हा चहा आणि कॉफी बनते तेव्हा त्यामधील तत्त्व हळूहळू बदलण्यात सुरुवात होते.
हे तापमान, हवा आणि इतर घटकांवर अवलंबून असतं.
वेळेनुसार, चहा आणि कॉफीमध्ये असलेले एंटीऑक्सिडंट्स आणि कॅफेनमधील गरजेची तत्त्व कमी होतात.
याशिवाय बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीवांची त्यामध्ये वाढ होते. जे आरोग्यासाठी हानिकारक असतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चहा आण कॉफी बनवल्यास १५ ते २० मिनिटांच्या आत प्यायला पाहिजे.