Liver cancer early symptoms saam tv
लाईफस्टाईल

Liver Tumor Symptoms: लिव्हरच्या सर्व गाठी कॅन्सरच्या असतात का? डॉक्टरांनी सांगितला फरक आणि लक्षणे

Liver Cancer Symptoms: लिव्हरमध्ये आढळणाऱ्या सर्व गाठी कॅन्सरच्या नसतात. तज्ज्ञ डॉक्टर सौम्य आणि घातक ट्यूमरमधील फरक, लक्षणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व स्पष्ट करतात.

Sakshi Sunil Jadhav

लिव्हर हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून त्याच्या मदतीने मेटाबॉलिझम, डिटॉक्सिफिकेशन आणि पचनासारख्या अनेक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडतात. मात्र याच अवयवाची रचना जटिल आणि रक्तपुरवठा समृद्ध असल्यामुळे त्या जागी अनियमित गाठी तयार होण्याची शक्यता जास्त असते. या गाठी काही वेळा सौम्य असतात तर काही घातक कॅन्सरच्या आजाराच्याही असू शकतात.

HCG कॅन्सर सेंटर, बोरीवली येथील कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. आदित्य पुनमिया यांनी HT Lifestyle बद्दल बोलताना सांगितले की, रुग्णांमध्ये एक मोठा गैरसमज असतो. लिव्हरमध्ये ट्यूमर असल्यास ते कॅन्सरच असते. मात्र प्रत्यक्षात सर्व लिव्हर ट्यूमर कॅन्सरचे नसतात. हे समजणं अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य निदानावरच उपचार अवलंबून असतात.

तज्ज्ञांच्या मते, कोणतीही अनियमित गाठ किंवा घनता लिव्हरमध्ये आढळली तर तिला 'लिव्हर ट्यूमर' म्हटलं जातं. हे ट्यूमर सौम्य बेनाइन किंवा घातक मॅलिग्नंट अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. बहुतेक वेळा हेमॅन्जिओमा, फोकल नोड्युलर हायपरप्लेसिया (FNH) आणि हेपॅटिक सिस्ट्ससारखे बेनाइन ट्यूमर उपचारांशिवायही ठीक राहतात आणि ते आकाराने मोठे होत नाहीत किंवा त्रास देत नाहीत तोपर्यंत उपचारांची गरजही भासत नाही.

याउलट, जेव्हा ट्यूमर कॅन्सरच्या आजाराचा असतो तेव्हा त्याला लिव्हर कॅन्सर म्हटलं जातं आणि त्यातील सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (HCC). तसेच शरीराच्या इतर भागांतूनही काही कॅन्सर लिव्हरमध्ये पसरण्याची शक्यता असते, ज्यांना सेकंडरी कॅन्सर म्हणतात.

लिव्हरचे आजार किंवा ट्यूमर सुरुवातीच्या अवस्थेत शांतपणे वाढत जातात. विशेषतः सौम्य ट्यूमर कोणतेही विशिष्ट लक्षण न दाखवता बऱ्याच काळ वाढू शकतात. परंतु नंतर वजन कमी, भूक कमी होणे, सतत थकवा जाणवणे, पोटात दुखणे किंवा सूज येणे, मळमळ, उलट्या, तसेच डोळे आणि त्वचेचा पिवळेपणा यांसारखी लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणे इतर आजारांमध्येही दिसू शकतात, त्यामुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे योग्य स्क्रीनिंग अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे -मनमाड-इंदूर महामार्गावर वाहतूक कोंडी; 4 तासापासून वाहने एकाच जागेवर

मुंबई गोवा महामार्गावर कार अन् कंटेनरचा अपघात, दोघांचा मृत्यू, तर मुबंई - पुणे महामार्गावरही ट्राफिक जाम

Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 : 'रणवीर सिंह'नं केलं 'कपिल शर्मा'ला धोबीपछाड, पहिल्या दिवशी 'किस किसको प्यार करू 2' ने कमावले फक्त 'इतके' कोटी

KDMC Election : केडीएमसी निवडणुकीपूर्वी आरक्षणावर वाद! शिंदे गटाची हायकोर्टात धाव; कल्याणमध्ये राजकीय खळबळ

Mumbai Metro 8: मुंबई ते नवी मुंबई फक्त 35 मिनिटांत, मेट्रोचा नवा मार्ग कसा असेल? किती स्थानके ? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT