applying perfume  
लाईफस्टाईल

Perfume use: बॉडी स्प्रे मारताय? 'ही' एक चूक आयुष्याचा रंग बदलेल

Surabhi Kocharekar

आजकाल जवळपास प्रत्येकजण परफ्यूमचा वापर करतो. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त घाम येत असल्याने लोकं परफ्यूमचा अधिक वापर करतात. घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि फ्रेश वाटावं म्हणून लोकं परफ्यूमला प्राधान्य देतात. मात्र परफ्यूममुळे तुमची त्वचा काळी पडतेय हे तुम्हाला माहितीये का? जर तुम्ही परफ्युम थेट त्वचेवर मारत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला फ्रेश वाटण्याच्या नादात तुमच्या मानेजवळील हायपरपिग्मेंटेशन होण्याचा धोका असतो. सोप्या भाषेच सांगायचं झालं तर तुमच्या मानेजवळील त्वचा काळी पडण्याची शक्यता अधिक असते.

परफ्युममधील घटक तुमच्या त्वचेसाठी धोकादायक?

यासंदर्भात क्युटीस स्किन स्टुडीओच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल म्हणाल्या की, कॉलर बोन, मनगट हे प्लस पॉईंट असल्याने यांच्यावर परफ्युम मारला जातो. परफ्युममध्ये असलेल्या काही घटकांमुळे इचिंग, त्वचा लाल होणं, त्वचेला खाज येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र परफ्युम मारल्यानंतर त्यामधील घटक ज्यावेळी बाहेर पडतात तेव्हा त्यांचं ऑक्सिडेटीव्ह बदलतं. यामुळे त्वचा काळी पडण्याची भीती असते. ज्या व्यक्तींची त्वचा कोरडी असते, त्यांना हा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे परफ्युम मारण्यापेक्षा बॉडी मीस्टचा वापर करणं फायदेशीर ठरेल.

शरीफा स्किन केअर क्लिनिकच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. शरीफा चौसे म्हणाल्या, वातावरणातील दमटपणा आणि त्यामुळे येणारा घामाचा वास टाळण्यासाठी तसेच दिवसभर स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी आपण अनेकदा परफ्यूम वापरतो. मात्र मानेवर परफ्युम लावल्याने तुमच्या मानेचा रंग काळा पडण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये वापरण्यात येणारे काही रसायने सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर एक विशिष्ट प्रतिक्रिया करतात. यामुळे त्वचेवर जळजळ आणि ऍलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी बऱ्याचदा कपड्यांवर परफ्यूम लावण्याचा सल्ला दिला जातो.

डॉ. चौफे पुढे म्हणाल्या, परफ्युममध्ये वापरले जाणारे काही घटक जसं की, अल्कोहोल आणि सिंथेटिक सुगंध यांच्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. यामुळे त्वचेमध्ये अॅलर्जी निर्माण होऊ शकते. प्रभावित भागात पुरळ उठणे, लालसरपणा, खाज सुटणे, ऍलर्जी होऊ शकते आणि मान काळवंडण्यासारखी समस्या वाढू शकते.

नैसर्गिक उत्पादनांचा वापर करुन तयार परफ्युम जळजळ आणि प्रकाश संवेदनशीलतेचा धोका कमी करू शकतात. कारण त्यामध्ये अनेकदा घातक रसायनं आणि कृत्रिम सुगंध नसतात. या नैसर्गिक अशा उत्पादनांमध्ये कोणतेही अॅलर्जी किंवा फोटोसेन्सिटायझिंग एजंट नसल्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे.

परफ्युम वापरण्यापुर्वी पॅच टेस्ट करा

जर तुम्ही परफ्यूम वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेऐवजी कपड्यांवर लावा. याशिवाय कोणताही परफ्यूम वापरण्यापूर्वी तुम्ही त्याची पॅच टेस्ट करा जेणेकरुन ते तुमचासाठी योग्य आहे की नाही याची खात्री करता येईल. तसेच, जर तुम्हाला कोणत्याही परफ्यूममुळे त्वचेची जळजळ होणे किंवा खाज येत असेल तर अशी उत्पादने वापरणे बंद करा.

तुम्हाला काही उत्पादनांची ॲलर्जी असू शकते म्हणून कोणतेही उत्पादन लागू करण्यापूर्वी तुम्ही नेहमी नवीन उत्पादन एखाद्या लहान भागात किंवा चाचणी पॅचवर वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचेला ऍलर्जी नाही याची खात्री करून घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT