Apple Cider Vinegar Side effects, Health Issue
Apple Cider Vinegar Side effects, Health Issue ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Apple Cider Vinegar Side effects : वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर पिताय? तर होऊ शकतो हा गंभीर आजार

कोमल दामुद्रे

Apple Cider Vinegar Side effects : वजन कमी करण्यासाठी आपण हव्या त्या गोष्टी खाण्यास व पिण्यास तयार असतो. व्यायाम किंवा जीम करण्याचा कंटाळा आल्यावर आपण आपल्या आहारात अशा काही पदार्थांचा समावेश करतो ज्यामुळे आपले वजन तर कमी होते पण आपल्या शरीराला त्याचे नुकसान होते.

हे देखील पहा -

अॅपल सायडर व्हिनेगर बहुतेक घरांमध्ये वापरले जाते. हे सफरचंदाच्या रसापासून तयार केलेले व्हिनेगर आहे. पदार्थांची चव वाढवण्यापासून आरोग्य सुदृढ बनवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. जीवनसत्त्वांसोबतच अनेक प्रकारची पोषकतत्त्वेही यामध्ये असतात. जे आपल्या शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात.

अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर रक्तातील साखर कमी करणे, वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, रक्तदाब कमी करणे, संधिवात वेदना कमी करणे यासारख्या समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. परंतु, याचे जितके चांगले परिणाम होतात तितके वाईटही. या व्हिनेगरचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.

१. अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातील कॅलरी वाढवण्यास मदत करते परंतु, यामुळे आपल्याला गॅस्ट्रोपेरेसिस देखील होऊ शकतो. अशावेळी पोटातील शिरा नीट काम करत नाहीत, यामुळे पोट सतत दुखू लागते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, टाइप १ मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांमध्ये ही स्थिती अधिक दिसून येते. यात व्हिनेगरच्या सेवनामुळे शरीराची स्थिती आणखी वाईट होते. गॅस्ट्रोपेरेसिसच्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ, सूज येणे आणि मळमळ यांचा समावेश होतो.

२. अॅपल सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास दात किडतात. तसेच याच्या सेवनामुळे दात पिवळे पडण्याची समस्या देखील होऊ शकते. यामध्ये असलेले ऍसिड दातांची संवेदनशीलता वाढवते. विशेषतः जर आपण नियमितपणे व्हिनेगर सेवन करत असल्यास हा त्रास होतो.

३. पोटॅशियमच्या कमी पातळीमुळे हायपोक्लेमिया होऊ शकतो. हे अॅपल सायडर व्हिनेगरच्या जास्त वापरामुळे होते. हे हाडांची खनिज कमी करू शकतात ज्यामुळे हाडे नाजूक होतात. अशा परिस्थितीत हाडे तुटण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. म्हणून, ऑस्टियोपोरोसिस असलेल्या लोकांसाठी सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर टाळण्यास सांगितला जातो.

४. त्वचा (Skin) निरोगी बनवण्यासाठी आपण अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर करत असू तर यामुळे आपली त्वचा बर्न होऊ शकते. त्यात असणाऱ्या मजबूत अम्लीय पदार्थ थेट चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचे नुकसान होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT