Child Care Tips : मुलांच्या आहारात या लाल रंगाच्या पदार्थांचा समावेश करा, अन्यथा होईल डोळ्यांवर दूष्परिणाम

बाळाचे आरोग्य सुदृढ राखायचे असेल तर या पदार्थांचे सेवन करा.
Child care tips, Parenting tips
Child care tips, Parenting tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

Child Care tips : आपल्या भारतीय आहारात असे काही पदार्थ आहे ज्याचा वापर आपण शिजवूनही खाऊ शकतो किंवा डाएटमध्ये पण त्याचा समावेश करु शकतो. मुल जन्माला आल्यानंतर कोणत्या महिन्यापासून त्याला रंगांचे पदार्थ खाऊ घालायचे हा प्रश्न बऱ्याच पालकांना पडतो.

हे देखील पहा -

भारतात गाजर ही अशी भाजी आहे जी शिजवून खाल्ली जाते आणि सॅलडमध्ये कच्चीही खाल्ली जाते. गाजराची चव ही गोड असते. बाळाच्या आहारात गाजराचा समावेश करण्यापूर्वी, आपण हे जाणून घ्यायला हवे ते बाळाला कोणत्या महिन्यात खाऊ घालायचे तसेच त्याचे फायदे व तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.

बऱ्याच पालकांना असे वाटते की, बाळाच्या आहारात गाजर उकळवून बाळाला खाऊ घालण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तसेच योग्य वेळी त्यांच्या आहारात याचा समावेश करणे अधिक गरजेचे आहे. इतर भाज्यांप्रमाणे गाजरही योग्य वयात बाळाला खायला दिल्यास अधिक फायदे मिळू शकतात. आपण बाळाला ८ महिन्यानंतर गाजर खायला घालू शकतो. हे देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Child care tips, Parenting tips
Diabetes rising among kids : मुलांना सतत गोड खावेसे वाटते ? तुमच्या मुलांना हा आजार तर नाही ना, जाणून घ्या

गाजरांमध्ये काही गुणधर्म आहेत जे थेट बाळाच्या (Baby) पेशींच्या वाढीवर परिणाम करतात. गाजर दुखापत झाल्यास किंवा जखम लवकर बरी करण्यास मदत करते. सध्याच्या काळात मुलांची प्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप गरजेचे आहे. रक्तातील प्लेटलेट्स आणि लिम्फोसाइट्स रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. गाजर या दोन गोष्टी वाढवून मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

गाजरात जीवनसत्त्व (Vitamins) ए आणि बीटा कॅरोटीन आहे. हे दोन्ही घटक आपल्या डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी मदत करतात. हे रेटिनाच्या वाढीस मदत करते. आपल्या मुलांचे डोळे कमकुवत असतील किंवा त्याची दृष्टी वाढवायची असेल, तर त्याच्या आहारात गाजराचा अवश्य समावेश करा. तसेच यातील असणारे घटक रक्ताभिसरण प्रणाली केवळ हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन वाहून नेत नाही तर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. गाजरात फ्लेव्होनॉइड्स नावाचे सूक्ष्म पोषक घटक असतात. ते हृदय आणि मूत्रपिंडांचे आरोग्य सुधारतात आणि त्यांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com