Main Causes of Oral Cancer Apart from Smoking saam tv
लाईफस्टाईल

Oral Cancer Causes Non-Tobacco : तंबाखूशिवाय ही आहेत तोंडाचा कॅन्सर होण्याची प्रमुख 4 कारणं; तुम्हीही या चुका करता नाही ना!

Main Causes of Oral Cancer Apart from Smoking: तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण हे तंबाखूचं सेवन मानलं जातं. मात्र आजकाल तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन न करणाऱ्यांना देखील तोंडाचा कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. यामध्ये तोंडाचा कॅन्सर तोंडाचा कर्करोग हा धोकादायक मानला जातो. तोंडाच्या कॅन्सरमुळे दरवर्षी लाखो लोकं त्यांचा जीव गमावतात. तोंडाच्या आतील पेशी कोणत्याही नियंत्रणाशिवाय वाढू लागल्यावर तोंडाचा कॅन्सर होतो. हा कॅन्सर केवळ तोंडातच नाही तर जीभ, ओठ आणि हिरड्यांमध्येही होण्याची शक्यता असते.

तंबाखू किंवा सिगारेट हे तोंडाच्या कॅन्सरचं सर्वात मोठं कारण मानलं जातं. परंतु अनेक वेळा असं पाहायला मिळतं की, जे कधीही धूम्रपान करत नाहीत, दारू पित नाहीत किंवा तंबाखूचं सेवन करत नाहीत त्यांनाही हा कॅन्सर होतो. यामागे काय कारणं असू शकतात ते जाणून घेऊया.

उन्हात अधिक वेळ राहणं

तंबाखू व्यतिरिक्त जास्त वेळ उन्हात राहणं देखील तोंडाच्या कॅन्सरचं एक कारण असू शकतं. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. यावेळी कमी वेळ उन्हात राहणं फायदेशीर आहे, परंतु जास्त वेळ उन्हात राहणं हानिकारक ठरू शकतं. सूर्यप्रकाशात असलेले अल्ट्राव्हायोलेट किरण ओठ आणि जबडाच्या त्वचेला नुकसान पोहोचवतात. परिणामी तोंडाचा किंवा ओठांचा कॅन्सर होऊ शकतो.

तोंडाची स्वच्छता

जर तुम्ही योग्य पद्धतीने तोंडाची स्वच्छता ठेवली नाही तर तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका असतो. तंबाखू व्यतिरिक्त दात आणि तोंडाची योग्य स्वच्छता न केल्याने तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. जर तोंडाची स्वच्छता योग्य प्रकारे केली नाही किंवा दातांमध्ये कोणताही आजार असेल तर यामुळे तोंडाचा संसर्ग आणि नंतर कॅन्सर देखील होऊ शकतो.

भेसळयुक्त खाणं

भेसळयुक्त अन्न आणि खराब अन्नामुळे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ खूप वाढलीये. सध्या अशा परिस्थितीत हे भेसळयुक्त अन्न तुमच्या शरीराला हानी पोहोचवतं. शिवाय हे कॅन्सरचं कारण देखील बनू शकतं.

एचपीवी वायरस

एचपीव्ही व्हायरस हा देखील तोंडाच्या कॅन्सरचं एक कारण बनू शकतो. एचपीव्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस अनसेफ शारीरिक संबंध, स्पर्श किंवा शिंका आणि खोकल्याशी संपर्क साधून एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो.

ओठांवरील जखम

तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीचं अजून एक लक्षणं म्हणजे तोंडावर किंवा ओठांवर जखम होणं जी अनेक आठवडे बरी न होणं. तोंडात किंवा ओठांमध्ये कोणतीही गाठ येणं, तोंडात पांढरे किंवा लाल डाग येणं, चावण्यास तसंच गिळण्यास त्रास होणं अशी लक्षणं यावेळी दिसून येतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT