Heart Health News  AI Image
लाईफस्टाईल

Aortic Stenosis : सततचा थकवा दुर्लक्षित करू नका! हार्टच्या 'या' भयंकर आजाराची असू शकतात लक्षणे

Aortic Stenosis Heart Attack Health Tips : वयाच्या ५५ वर्षांनंतर सतत थकवा, धाप लागणे, पायांना सूज किंवा चक्कर येत असल्यास दुर्लक्ष करू नका. ही एऑर्टिक स्टेनोसिसची लक्षणे असू शकतात.

Alisha Khedekar

वाढत्या वयात थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. मात्र, वयाच्या ५५ वर्षांनंतर सतत थकवा जाणवणे, थोडे चालल्यानंतर धाप लागणे किंवा जिने चढताना दम लागणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. ही लक्षणे हृदयाशी संबंधित आजार वाढवणारी असू शकतात, असा इशारा हृदयरोगतज्ज्ञांनी दिला आहे.

आपल्या हृदयामध्ये चार लेअर असतात. हे ४ झडप रक्तप्रवाह योग्य दिशेने सुरू ठेवण्याचे काम करतात. मात्र, वाढत्या वयामुळे काही वेळा हे लेअर लांबलचक होतात किंवा व्यवस्थित बंद होत नाहीत. त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. या समस्येला हृदयाच्या झडपांचा आजार म्हणजे 'एऑर्टिक स्टेनोसिस' (Aortic stenosis)

काय आहेत धोक्याची लक्षणे?

  • थोडे चालल्यानंतरही थकवा जाणवणे.

  • चालताना किंवा जिने चढताना धाप लागणे.

  • पाय किंवा घोट्यांना सूज येणे.

  • चक्कर येणे किंवा अचानक बेशुद्ध पडणे.

  • हृदयाची धडधड वाढणे.

  • पूर्वी सहज करता येणारी कामे करताना त्रास होणे.

  • ही लक्षणे जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉक्टर रुग्णाची लक्षणे आणि प्रकृती तपासून 2D इको (इकोकार्डिओग्राफी) करण्याचा सल्ला देऊ शकतात. या तपासणीत अल्ट्रासाऊंडच्या मदतीने हृदयाची रचना आणि झडपांचे कार्य तपासले जाते. काही रुग्णांमध्ये हृदयाची झडप गंभीर स्वरूपात अरुंद झाल्यास ती बदलण्याची गरज पडू शकते. अशा वेळी TAVR (ट्रान्सकॅथेटर एऑर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) ही प्रक्रिया काही रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये शस्त्रक्रिया न करता रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या मदतीने नवीन झडप बसवली जाते. मात्र, हा उपचार योग्य आहे की नाही, याचा निर्णय तज्ज्ञ डॉक्टर घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पायल झांबरेला न्याय द्या! आरोपींना आमच्या ताब्यात द्या; भावाची कोर्टाबाहेर संतप्त मागणी

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या; राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Pension Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट! सरकारकडून नवीन नियम जाहीर

Ind vs NZ Highlights : पावसाचा अडथळा आणि किंग कोहलीचं तुफान...भारतानं पहिल्याच वनडेत न्यूझीलंडला लोळवलं

मोदी सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट! अग्निवीर योजनेत मोठा बदल; मिळेल कायमस्वरूपी नोकरी अन् वाढीव वेतन

SCROLL FOR NEXT