Anger Can Harm Your Heart SAAM TV
लाईफस्टाईल

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Anger Can Harm Your Heart: नव्या संशोधनानुसार केवळ ८ मिनिटांचा रागही रक्तवाहिन्यांवर ४० मिनिटांपर्यंत नकारात्मक परिणाम करू शकतो. वारंवार राग येण्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

क्वचितच असा कोणी असेल ज्याला कधी राग आला नसेल. घरी, कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना अनेकदा आपल्याला चीड येऊन राग येतो. मुळात राग ही व्यक्त करण्यात येणारी एक सामान्य भावना आहे. जर तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येत असेल तर सावध व्हा. कारण संशोधनातून असं दिसून आलंय की, राग आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. चला जाणून घेऊया राग तुमच्या हृदयावर कसा परिणाम करतो.

नव्या संशोधनातून काय समोर आलं?

या संशोधनात, शास्त्रज्ञांना असं आढळून आलंय की, ८ मिनिटांचा राग देखील पुढील ४० मिनिटांसाठी तुमच्या रक्तवाहिन्यांवर नकारात्मक परिणाम करू शकतो. हा परिणाम असा असतो की, रक्तवाहिन्यांची विस्तार आणि आकुंचन पावण्याची क्षमता जवळपास निम्मी होते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो .

२८० लोकांवर करण्यात आला अभ्यास

या अभ्यासात २८० लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांना हृदयरोग किंवा मधुमेह नव्हता याची खात्री करून घेण्यात आली. त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं आणि विविधं कामं करण्यास सांगण्यात आलं. काहींना भूतकाळातील रागाच्या घटना आठवण्यास सांगितलं तर काहींना दुःखद किंवा चिंताजनक घटना आठवण्यास सांगण्यात आलं. दरम्यान, एका गटाला पूर्णपणे शांत राहण्यास सांगितलं गेलं.

या संशोधनानंतर समोर आलेला निकाल खूपच आश्चर्यकारक होता. यातून असं समोर आलं की, रागावलेल्या लोकांच्या नसांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर जे दुःखी किंवा चिंताग्रस्त होते त्यांना असे दुष्परिणाम जाणवले नाहीत.

राग येतो तेव्हा काय होतं?

रागाचा शरीरावर धोकादायक परिणाम होतो कारण कॉर्टिसोल आणि अ‍ॅड्रेनालाईन सारखे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात. हे हार्मोन रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला आकुंचन पावतात. यामुळे रक्तप्रवाह योग्यरित्या न होता हृदयावर अधिक ताण निर्माण होतो.

जास्त धोका कधी असतो?

जर तुम्हाला अधूनमधून राग येत असेल तर ते धोकादायक नाही. जर तुम्हाला वारंवार राग येण्याची सवय लागली तर धोका वाढतो. यामुळे तुमच्या नसा बऱ्या होण्यास वेळ मिळत नाही आणि कालांतराने ब्लॉकेज आणि गंभीर हृदयाच्या समस्या निर्माण होतात.

कसा कंट्रोल करावा राग?

  • जेव्हा राग येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. दीर्घ श्वास घ्या आणि १० पर्यंत मोजा.

  • स्वतःला शारीरिकदृष्ट्या एक्टिव्ह ठेवा. दररोज थोडं चालणं, योगा किंवा व्यायाम करा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.

  • मन शांत करण्यासाठी ध्यान किंवा खोल श्वास घेण्याचे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात.

  • जर तुम्ही तुमचा राग नियंत्रित करू शकत नसाल तर डॉक्टरांशी बोला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन, फुटबॉल खेळताना मैदानातच कोसळले, देशावर शोककळा!

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT