Anant Chaturdashi 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Anant Chaturdashi 2023 : निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी! मूर्तीचे विसर्जन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Ganpati Bappa Morya : भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरु झालेला गणेशोत्सव हा भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपत आहे.

कोमल दामुद्रे

Ganesh Visarjan 2023 :

आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळी आली. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून आज गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन होईल. १० दिवसांपासून सुरु असलेल्या उत्सवाची आज सांगता होणार आबे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुरु झालेला गणेशोत्सव हा भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला संपत आहे.

या दहा दिवसांच्या काळात आपण बाप्पाची मनोभावे पूजा आणि अर्चना केली. यंदा विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता? योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया

1. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता?

  • पचंगानुसार दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्दशी तिथीला गणेश विसर्जन केले जाते.

  • चतुर्दशी तिथीची सुरुवात: 27 सप्टेंबर बुधवार, रात्री 10:18 वाजता.

  • चतुर्दशी तिथीची समाप्ती: 28 सप्टेंबर, गुरुवार, संध्याकाळी 06:49 वाजता.

2. गणेश विसर्जनाची शुभ वेळ:

  • आज, सकाळी 06:11 ते 07:40.

  • सकाळी 10:42 पर्यंत, दुपारी 03:11, दुपारी 04:41 ते रात्री 09:12 पर्यंत.

  • रवि योग: सकाळी 06:12 ते 01:48 पर्यंत

3. गणेश विसर्जनाची पद्धत

1. सर्वात आधी स्नान करुन कपाळाला तिलक लावा. गणेशमूर्तीसमोरील आसनावर बसून बाप्पाची पूजा करा.

2. ओम गं गणपतये नमो नम: मंत्रोच्चारांसह अक्षता, कुंकू, फुले, धूप, दीप, सुगंध इत्यादींनी गणेशाची पूजा करा.

3. तुपाचा दिवा किंवा कापूर लावून गणेशाची विधिवत आरती म्हणा. बाप्पाला सर्व दु:ख आणि पापांचा अंत होण्यासाठी प्रार्थना करा.

4. जर तुम्ही घरात किंवा अंगणात विसर्जन करत असाल तर पाण्याने भरलेल्या बादलीत किंवा टबमध्ये विसर्जित करा. नंतर ते पाणी झाडांमध्ये घाला.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT