Asthma In Kids Saam Tv
लाईफस्टाईल

Asthma In Kids : वायू प्रदूषणामुळे मुलांमध्ये वाढतोय दम्याचा आजार, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष नकोच!

Child Care Tips : वाढत्या प्रदूषणामुळे मुलांमध्ये व्हायरल फ्लू, घसा खवखवणे, खोकला आणि दम्याच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे.

कोमल दामुद्रे

Air Pollution Side Effects :

वाढत्या वायूप्रदूषणाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. राज्यात सतत हवामान होणाऱ्या बदलाचा प्रत्येक वयोगटातील व्यक्तीवर परिणाम होताना दिसून येत आहे. याचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे मुलांमध्ये व्हायरल फ्लू, घसा खवखवणे, खोकला आणि दम्याच्या विकारांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, दम्याची लक्षणे पालकांना सहसा ओळखता येत नाही. अभ्यासानुसार वाढत्या प्रदूषणातील विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करतात. जे दम्याचे मुख्य कारण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच सिगारेटचा धूर हे देखील मुलांसाठी (Child) धोकादायक आहे. धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धुम्रपान करणाऱ्यांच्या मुलांना दम्याचा त्रास होण्याची शक्यता अधिक जास्त असते.

पर्यावरणातील प्रदूषण (Pollution), आनुवंशिक घटक, अन्न पदार्थ, ऍलर्जी यामुळे १ ते १४ वर्षातील वयोगटातील मुलांमध्ये दमा होतो. मुलांमध्ये सर्दी किंवा श्वसानाचे आजार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रिफ्लेक्स आणि बदल किंवा प्रतिकूल हवामानामुळे देखील मुलांमध्ये दमा होऊ शकतो.

1. मुलांमध्ये दम्याची लक्षणे कशी ओळखाल?

५ वर्षांखालील मुलांमध्ये दमा ओळखणे कठीण आहे. नवजात आणि लहान मुलांमध्ये दम्याची प्रमुख लक्षणे जसे की, घसा खवखवणे, खोकला आणि इतर आजार (Disease) देखील उद्भवतात. मुलांना वारंवार श्वास घेण्यास अडचण येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • दम्याने ग्रस्त असलेल्या मुलांना अनेकदा खोकला किंवा घरघर होणे

  • छातीत घट्टपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे

  • चालताना धाप लागणे, सतत घाम येणे, ऍलर्जी होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 'हे' व्यायम नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT