Air Pollution Canva
लाईफस्टाईल

Air Pollution : वाढत्या प्रदूषणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आहारात 'या' Booster Food चा समावेश करा

ज्याप्रकारे प्रदूषण वाढत आहे, त्यानुसार फुफ्फुसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Air Pollution : दिवाळीचे फटाके फोडल्यानंतर व वाढत्या वाहतुकीच्या प्रदूषणामुळे वातावरणात अनेक प्रकारचे बदल होत आहेत. ज्याप्रकारे प्रदूषण वाढत आहे, त्यानुसार फुफ्फुसांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

आपण श्वास घेत असलेली हवा विषारी होत आहे, अशा स्थितीत आपला श्वासही विषारी बनत आहे, त्यामुळे या काळात तुम्हाला खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही त्याच्याशी लढू शकता. त्यासाठी तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करा.

एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे प्रदूषणाने लोकांना हैराण केले आहे. वाढलेले प्रदूषण ही सर्वांसाठी नवी समस्या बनली आहे. अशा स्थितीत या काळात होणारे प्रदूषण तुमच्या फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम करू शकते. प्रदूषणामुळे श्वसनाच्या समस्या, दमा आणि अगदी कर्करोग होऊ शकतो. त्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा हे जाणून घेऊया. (Air Pollution Side Effects)

1. काळी मिरी आणि आले

रोगप्रतिकारशक्ती मजबूत असेल तर आपले शरीर प्रत्येक आजारापासून दूर राहू शकते. आल्याचा रस आणि काळी मिरी पावडर एकत्र करून सेवन केल्याने शरीर आतून मजबूत होते. जर तुम्हाला हवे असेल तर आले मधात मिसळून किंवा काळी मिरी मधात मिसळून खा, फुफ्फुसांशी संबंधित समस्या दूर होईल.

2. 'जीवनसत्त्व क' चा अधिक समावेश

व्हिटॅमिन सी समृद्ध फळे आणि भाज्या खा. लिंबू, संत्री, किवी चा समावेश करा. आंबटपणा असलेल्या भाज्या खा. टोमॅटोही खाऊ शकता.

3. गूळ आणि चणे खा

गूळ आणि चणे यांचा आहारात समावेश करा. एवढेच नाही तर रोज सकाळी गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते आणि थकवा, अशक्तपणा, रक्ताची कमतरता हे सर्व दूर होतात. गुळामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात, त्यामुळे ते अस्थमाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये भरपूर लोह आढळते.

4. ऑलिव तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) ई आढळते, जे फुफ्फुसाची समस्या दूर करते आणि त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे फॅटी अॅसिड शरीरासाठी फायदेशीर असतात.

5. सूप आणि ताक प्या

सूप आणि ताक पिणे देखील खूप आरोग्यदायी आहे, त्यात मीठ आणि जिरे पूड टाकल्यास खूप फायदा होईल.

6. पाण्याची कमतरता

प्रदूषण (Pollution) टाळण्यासाठी शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, पाण्याचे प्रमाण योग्य ठेवून चयापचय मंदावत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, कोकण - घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट; इतर ठिकाणी काय परिस्थिती?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल

Success Story: शाळेसाठी रोज १० किमीची पायपीट, सलग दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS वीर प्रताप सिंह यांचा प्रवास

Ardhakedra Yog: बुध-गुरु बनवणार दुर्मिळ राजयोग; 3 राशींच्या व्यक्तींची होणार एका रात्रीच चांदी

Friday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या मागे कटकटीची पीडा; आर्थिक ताण वाढणार, जाणून घ्या शुक्रवारचा दिवस कसा असणार?

SCROLL FOR NEXT