Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नको असलेले केस काढण्यासाठी आपण व्हॅक्सिंग किंवा ब्लिचिंग करतो मात्र अनेक महिलांना याची रिअॅक्शन होते. चेहऱ्यावर जळजळ होते.
यासाठी आज आम्ही तुम्हाला ओठांवर नको असलेले केस घालवण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स सांगणार आहोत.
साखर आणि लिंबाचा रस नैसर्गिकरित्या तुमच्या ओठांवरील केस कमी करतात. साखर, लिंबाचा रस आणि थोडे पाणी हे मिश्रण कोमट करून ओठांवर लावा आणि ५ मिनिटांनी सुकल्यानंतर केसांच्या विरूद्ध दिशेने ओढून काढा.
बेसन आणि चिमूटभर हळद याचे एकत्रित मिश्रण तुम्ही ओठांवर लावा आणि सुकून द्या यानंतर ते चोळून काढा यामुळे ओठांवरचे नको असलेले केस निघून जातात.
अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात थोडी साखर आणि कॉर्नफ्लोर मिसळा. ही पेस्ट ओठांवर लावा. २० मिनिटांनी ती कडक झाल्यावर हळुवारपणे ओढून काढा.
हळद आणि दूध याची पेस्ट करून ती ओठांवर लावा आणि १० मिनिटे ठेवा नंतर सुकल्यानंतर चोळून काढा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
केस काढल्यानंतर कोरफडाचे जेल किंवा बर्फ लावावा, जेणेकरून लालसरपणा येणार नाही.