Air Pollution Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution : वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो, कसे कराल स्वतःचे संरक्षण

Lungs Cancer : वायू प्रदूषण केवळ आपल्या पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप हानिकारक आहे.

Shraddha Thik

Lung Cancer Causes :

वायू प्रदूषण केवळ आपल्या पर्यावरणासाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप हानिकारक आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसतो. हवेतील प्रदूषणाचा परिणाम तुमच्या फुफ्फुसावर तसेच हृदयावर खूप नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषणाची पातळी जसजशी वाढते तसतसे फुफ्फुसाशी संबंधित अनेक आजारांचा धोका वाढतो.

थंडीची चाहूल लागताच प्रदूषण झपाट्याने वाढू लागते त्यामुळे फुफ्फुसाचे आजारही (Disease) वाढू लागतात. प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा कर्करोग देखील होऊ शकतो, त्यामुळे वाढत्या प्रदूषणादरम्यान संरक्षणासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

हवेच्या प्रदूषणामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, सावधगिरी बाळगणे अधिक महत्वाचे आहे. तुमची फुफ्फुस निरोगी (Healthy) ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते जाणून घ्या.

मास्क घाला

बाहेर जाताना नेहमी मास्क घाला. मास्क घातल्याने हवेतील छोटे कण फिल्टर होतात. त्यामुळे घराबाहेर पडताना नेहमी मास्क घाला. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांना मास्कशिवाय घराबाहेर पडू देऊ नका.

धूम्रपान करू नका

धूम्रपान आपल्या फुफ्फुसासाठी शापापेक्षा कमी नाही. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा (Cancer) धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. धुम्रपानामुळे फुफ्फुसांच्या हवा फिल्टर करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, जे प्रदूषण वाढवण्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. तसेच दुसऱ्या व्यक्तीने सोडलेला सिगारेटचा धूर टाळा. हे फुफ्फुसासाठी धूम्रपानाइतकेच हानिकारक आहे.

वायू प्रदूषणामुळे होणारे रोग

  • दमा

  • फुफ्फुसाचा कर्करोग

  • स्ट्रोक

  • जळजळ

  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग

वायू प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी

घरात रोपे लावा

तुम्ही तुमच्या घरामध्ये स्नेक प्लांट, मनी प्लांट यासारखी काही झाडे लावू शकता, ज्यामुळे तुमच्या घरातील हवा शुद्ध होईल. यासाठी तुम्ही व्हर्टिकल गार्डनिंग टेक्निक वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही कमी जागेत जास्त रोपे लावू शकाल.

व्यायाम करा

व्यायामामुळे तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. यामध्ये योग आणि प्राणायाम खूप मदत करू शकतात. यामुळे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि फुफ्फुसाच्या आजारांचा धोकाही कमी होतो.

विनाकारण बाहेर पडू नका

प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचा प्रयत्न करा. मास्क घातल्याने काही प्रमाणातच संरक्षण मिळू शकते. म्हणून, शक्य तितक्या कमी बाहेर जाण्याचा प्रयत्न करा.

एअर प्युरिफायर लावा

तुमच्या घरात एअर प्युरिफायर लावा. हे हवेतील प्रदूषण फिल्टर करते आणि तुम्हाला शुद्ध हवा देते. हे लहान मुले, गर्भवती महिला , वृद्ध लोक आणि रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते . तसेच वेंटिलेशनची काळजी घ्या. कमी प्रदूषण असताना ताजी हवा येण्यासाठी खिडक्या आणि दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करा.

हवेची गुणवत्ता तपासा

तुमच्या क्षेत्राचा AQI स्तर काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही इंटरनेट वापरू शकता. याद्वारे तुम्ही बाहेर किती प्रदूषण आहे हे जाणून घेऊ शकाल आणि त्यानुसार तुम्ही बाहेर जाण्याची वेळ ठरवू शकाल आणि खिडक्या आणि दरवाजे व्हेंटिलेशनसाठी उघडू शकाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT