Shraddha Thik
तापमान पूर्वीपेक्षा कमी झाले असून थंडी हळूहळू वाढू लागली आहे.
बहुतेकांना बदलते हवामान सहजासहजी सहन करता येत नाही, त्यामुळे ते आजारी पडतात.
काही लोक सर्दी टाळण्यासाठी गरम पाणी पिण्यास सुरुवात करतात. अनेकदा असे म्हटले जाते की गरम पाण्याने सर्दी आणि खोकला कमी होतो आणि लवकर बरे होण्यास मदत होते.
ज्या लोकांच्या नाकातील ऍलर्जीमुळे सायनस सुरू होतो त्यांनी कोमट पाणी प्यावे. थंड वातावरणात गरम पाणी पिण्याचा परिणाम कमी होतो.
सर्दी-खोकला झाल्यास नाक बंद पडते, घसा खवखवतो आणि खोकला येतो.
गरम पाणी केवळ सर्दीपासून बचाव करत नाही तर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की गरम पाणी प्यायल्याने शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.
गरम पाणी प्यायल्याने शरीराची पचनक्रिया व्यवस्थित राहते. गरम पाणी प्यायल्याने शरीरात अन्नाचा विघटन होतो. त्यामुळे अन्न सहज पचते. गरम पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या कमी होतात आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.