लाईफस्टाईल

Heart Attack: एआयची किमया, अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं, काय आहे सर्केडिया व्ही?

Heart Attack: अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं एआयवर आधारित असलेलं सर्केडिया व्ही नावाचं भारतीय अॅप्लिकेशन्स बनवण्यात आलंय.

Bharat Mohalkar

हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल, हे सांगता येत नाही... दरवर्षी जगभरात 1 कोटी 79 लाख लोकांचा मृत्यू होतो.. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही... कारण अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं एआयवर आधारित असलेलं सर्केडिया व्ही नावाचं भारतीय अॅप्लिकेशन्स बनवण्यात आलंय....मात्र हे अॅप कसं काम करणार? पाहूयात.

अमेरिकेत 15 हजार तर भारतात 700 रुग्णांवर चाचणी

हे अॅप हृदयरोगाशी संबंधित समस्या शोधणार

स्मार्टफोनवर हृदयाचे ठोके रेकॉर्ड करुन रोगाचं निदान करणार

रक्तवाहिन्यांसंदर्भात रोगाचंही निदान करणार तर या अॅप्लिकेशन्सची 96 टक्के इतकी अचूकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

हृदयरोगामुळे अनेकांची धडकी भरायची. मात्र 14 वर्षीय एनआरआय विद्यार्थी सिद्धार्थ नंदयाला याने सर्केडिया व्ही नावाचं अॅप्लिकेशन तयार केलंय.तर अॅप संदर्भात चर्चा करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी सिद्धार्थला बोलावलं होतं.. सिद्धार्थ हा कमी वयातील एआय एक्स्पर्ट असून त्याने ओरॅकल आणि ARM येथून प्रमाणपत्रं मिळवलंय. मात्र या अॅप्लिकेशनला भारतीय वैद्यकीय नियामक मंडळाची मंजूरी मिळालेली नाही.. त्यामुळे या अॅप्लिकेशनला कधी मंजूरी मिळणार आणि सर्वसामान्यांची हृदयरोगाच्या भीतीपासून कधी मुक्ती मिळणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT