Drinking Water According to Age saam tv
लाईफस्टाईल

Drinking Water According to Age: वयोमानानुसार तुम्ही किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Drinking Water Guidelines: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला देखील पाण्याची गरज असते. पाणी शरीराच्या सर्व अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी संरक्षण देतं. तुमच्या वयानुसार तुम्ही किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे हे तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

पाणी हे मानवी व्यक्तीचं जीवन मानलं जातं. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर अनेक आजार मागे लागण्याची शक्यता आहे. शरीराला फीट आणि फाईन ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. मानवी शरीर 65-70 टक्के पाण्याने बनलेलं आहे. यामुळेच शरीराला विविध कार्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते.

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला देखील पाण्याची गरज असते. पाणी शरीराच्या सर्व अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी संरक्षण देतं. पाण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वय, लिंग, शरीराचं वजन बदलते. सर्व लोकांसाठी पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. मात्र तुमच्या वयानुसार तुम्ही किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे हे तुम्हाला माहितीये का?

1-3 वर्षांच्या मुलांनी किती पाणी प्यावे?

आहारतज्ज्ञ शिखा कुमारी यांनी त्यांच्य एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय की, 1-3 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 4-5 कप किंवा 800-1000 मिली पाणी प्यायलं पाहिजे.

4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी किती पाणी प्यावे?

4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 1200 मिली किंवा 5 कप पाणी पिणं गरजेचं आहे. यामध्ये लिक्विड फूडचाही समावेश आहे.

9-13 वर्षांच्या मुलांनी किती पाणी प्यावे?

9-13 वर्षे वयोगटातील मुलांनी दररोज 7 ते 8 कप किंवा 1600-1900 मिली पिण्याची गरज आहे.

किशोरवयीन मुलांनी किती पाणी प्यावे?

14 ते 18 वर्षे वयोगटातील म्हणजेच किशोरवयीन मुलांनी दररोज 1900 ते 2600 मिली पाणी प्यायलं पाहिजे. म्हणजेच एकूण 8-11 कप पाणी पिणं गरजेचं आहे.

प्रौढ व्यक्तींसाठी प्रमाण

19 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांनी दररोज 8-11 कप म्हणजेच 2000 ते 3000 मिली पाणी प्यावे. दरम्यान या वयामध्ये पाण्याची गरज व्यक्तीची गरज, त्याचे वजन आणि हवामान या घटकांवर अवलंबून असते.

वयोवृद्धांना किती पाण्याची गरज?

65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांनी 8-11 कप किंवा 2000 ते 3000 मिली पाणी दररोज प्यावं. वृद्धापकाळात डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो त्यामुळे वृद्ध व्यक्तीने नेहमी पुरेसं पाणी प्यायलं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील अजित पवारांच्या उपस्थितीत कात्रज दूध डेअरी मध्ये सर्वसाधारण सभेचे आयोजन

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

SCROLL FOR NEXT