Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : मुलं झाल्यानंतर पती-पत्नीच्या आयुष्यात होतात अनेक बदल; नात्यात येतो दूरावा, अशावेळी काय कराल ?

Marriage Life : मुलाच्या जन्मानंतर, त्यांचे जीवन पुन्हा बदलू लागते. या बदलाचा त्यांच्या वैवाहिक जीवनाबरोबरच वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Marital Issues After Baby Birth : लग्न झाल्यानंतर अनेकांचे आयुष्य बदलते. अनेक जबाबदाऱ्याही वाढतात. स्त्री-पुरुष विवाहाच्या नात्यात बांधले जातात. त्यांच्यात आणखी अनेक नाती जोडली जातात. कुटुंब वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे लग्न.

अनेक जोडपे पालक बनल्यानंतर त्याच्या संसाराला एक वेगळे वळण मिळते. मुलाच्या जन्मानंतर, त्यांचे जीवन पुन्हा बदलू लागते. या बदलाचा त्यांच्या वैवाहिक (Marriage) जीवनाबरोबरच वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो. मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नी आई-वडील बनतात, परंतु यासोबतच त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

मुलाच्या जन्मानंतरच्या समस्या सकारात्मक दृष्टिकोनाने हाताळू न शकल्यास त्यांच्यात भांडणे वाढू लागतात. त्यामुळे मुलाच्या जन्मानंतर उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आधीपासून मानसिक तयारी ठेवावी.मुलाच्या जन्मानंतर वैवाहिक जीवनातील बदल आणि समस्यांबद्दल जाणून घेऊया.

1. वेळेचा अभाव

लग्न झाल्यापासून मुले होण्यापर्यंत पती-पत्नीकडे एकमेकांसाठी वेळ (Time) असतो, पण त्यांच्या आयुष्यात नवीन पाहुणा येताच त्यांचा परस्पर वेळ विभागला जातो. मुलाला वेळ दिल्याने पती-पत्नी एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढू शकते. म्हणूनच मूल झाल्यावरही जोडीदारासाठी थोडा वेळ काढा. मुलाची जबाबदारी घरातील मोठ्यांवर देऊन नवरा-बायको डिनर डेटला जाऊ शकतात, चित्रपट बघू शकतात किंवा फिरायला जाऊ शकतात.

2. झोपेचा अभाव

लहान मुले रात्री जास्त रडतात. यामुळे पती-पत्नीला पुरेशी झोप लागत नाही, कारण त्यांना रात्री अनेक वेळा जागून राहावे लागते. झोप झाल्याने दोघेही अस्वस्थ होतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात चिडचिड, डोकेदुखी आणि तणाव दिसून येतो. या लक्षणांमुळे (Symptoms) पती-पत्नी एकमेकांवर रागावू लागतात. यावर उपाय म्हणजे रात्रीच्या वेळी मुलाची दोघांनी काळजी (Care) घेतल्यास दोघांनाही पुरेशी झोप मिळेल.

3. पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध नसणे

मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीचे पूर्ण लक्ष त्यांच्या संगोपनावर असते. मुलाशी खेळणे, त्याच्या कृत्यांवर हसणे, खोडकरांवर लक्ष ठेवणे यामुळे पती-पत्नीच्या आयुष्यातून प्रेम नाहीसे होऊ लागते. मुलाची काळजी घेऊन लोक त्यांच्या जोडीदारासोबतचा (Partner) रोमान्स कमी करतात, ज्यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये समस्या निर्माण होऊ लागते. म्हणूनच पती-पत्नीने एकमेकांकडे लक्ष दिले पाहिजे.

यासाठी दोघांनी मिळून मुलांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नानुसार मुलाला वाढवा आणि बजेट बनवून काम करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

SCROLL FOR NEXT