Bike Ride Destination Saam Tv
लाईफस्टाईल

Bike Ride Destination : अॅडव्हेंचर ट्रिप प्लान करताय? भारतातील या नयनरम्य पर्यटन स्थळांना भेट द्या

Winter Season Travel : जर तुम्हालाही अॅडव्हेंचर ट्रिप करुन फिरायला जायचे आहे तर या निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

कोमल दामुद्रे

Indian Off Ride Travel Place :

हिवाळा ऋतू, गुलाबी थंडी आणि आवडते ठिकाण. सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जाण्याची हौस असते. आजच्या काळात बाइक राइड डेस्टिनेशनची क्रेझ अधिक प्रमाणात पाहायला मिळते.

हल्ली बाजारात अॅडव्हेंचर ट्रिपला जाण्यासाठी देखील तशा पद्धतीच्या बाईक्स देखील पाहायला मिळतात. जर तुम्हालाही अॅडव्हेंचर ट्रिप करुन फिरायला जायचे आहे तर या निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मनाली ते लेह

बाइक (Bike) राइडर्ससाठी मनाली ते लेह ही रोड ट्रिप अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही. या ट्रिप दरम्यान हिमालयाचे निसर्गसौंदर्य पाहाता येईल. तसेच बाइकवरुन करता येणारा हा प्रवास (Travel) अधिक थरारक असेल. यावेळी तुम्ही सरचू, जिस्पा किंवा केलाँग या ठिकाणी थांबू शकता.

2. दिल्ली ते आग्रा

दिल्ली ते आग्रा या ठिकाणी बाइकने केला जाणारा प्रवास हा अविस्मरणीय असणार आहे. या प्रवासासाठी तुम्ही यमुना एक्सप्रेसवेने जाऊ शकता. या ठिकाणी राइड करताना स्पीड ओव्हर नसल्याला हवा. हा एक्सप्रेसवे नोएडापासून सुरु होतो आणि ताजमहाल फक्त 238 किलोमीटर अंतरावर आहे. हवे असल्यास तुम्ही मथुरेलाही थांबू शकता.

3. जयपूर ते जैसलमेर

तुमच्या ट्रिपमध्ये (Trip) रायडिंगसाठी जयपूर ते जैसलमेरचा देखील प्लान करु शकता. जर तुम्हाला वाळंवटातून फिरायचे असेल तर ही ट्रिप मस्त असेल. पिंक सिटी, जयपूर ते गोल्डन सिटी, जैसलमेरपर्यंतचा हा रोमांचक बाइकचा ट्रिपचा आनंद घेऊ शकता.

4. बंगळुरु ते उटी

बंगळुरु ते उटी तुम्हाला ट्रिपचा आनंद घ्यायचा असेल तर रामनगरा आणि म्हैसूर सारख्या शहरांमधून तुम्ही लांब रोड ट्रिप करु शकता. तसेच यादरम्यान तुम्ही म्हैसूर पॅलेसला भेट देऊ शकता. उटीला पोहोचल्यानंतर निलगिरी घाट, उटी टी गार्डन आणि निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT