Home Remedies for Acidity  yandex
लाईफस्टाईल

Acidity: सतत अ‍ॅसिडीटी होते? मग खा 'हे' फळ, लगेच मिळेल आराम

Home Remedies for Acidity: तुम्ही उशीरा जेवल्यामुळे तुम्हाला अनेक पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यात कामाच्या गडबडीमुळे लोक मिळेल त्यावेळेनुसार जेवतात. मात्र, हे जेवण तुमच्या शरीराला योग्य पोषण देत नाही. तुम्ही उशीरा जेवल्यामुळे तुम्हाला अनेक पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हे सगळे असताना वेळेवर आहार घेणे होतचं नाही. अशावेळेस तुम्ही एक साधा आणि घरगुती उपाय करा. त्याने तुमच्या जिवनशैलीत अ‍ॅसिडीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यास मदत होईल.

तुम्ही हे एक फळ खाल्याने तुमची अ‍ॅसिडीटी गायब होवू शकते.

जेव्हा तुम्ही उशीरा जेवता तेव्हा तुम्हाला सकाळी उठल्यावर अ‍ॅसिडीटीची समस्या जाणवते. अशा वेळेस तुम्ही आयुर्वेदिक घरगुती उपचार करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. अ‍ॅसिडीटी घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी केळ खा.

केळ हे उत्तम पचनासाठी योग्य आहे. शिवाय ते पचायला हलके आहे. या फळामध्ये आम्ल कमी असल्याने अ‍ॅसिडीटीचे प्रमाण कमी होते. केळामध्ये पोटॅशियम आणि फायबर यांचे प्रमाण अधिक असते. अ‍ॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांवर केळ खाणे खूप फायदेशीर असते.

केळ कधी आणि किती खावे?

सकाळी नाश्ता करण्याच्या आधी केळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरु शकते. तुम्ही एक किंवा जास्तीत जास्त दोन केळ्यांचे सेवन करु शकता. एवढे केळ अ‍ॅसिडीटीवर उत्तम रित्या काम करु शकते.

अ‍ॅसिडीटी झाल्यास काय काळजी घ्याल?

सकाळी उठल्यावर तुम्ही एक ग्लास गरम पाणी घ्या. त्याने तुमची अ‍ॅसिडीटी कमी होईल. तुम्ही गरम चहा किंवा कॉफी यांचे सेवन करणे टाळा.

अ‍ॅसिडीटी न होण्यासाठी काय कराल?

तुम्ही जेवण किमान झोपण्याच्या ३ तास आधी करा. त्यानंतर तुम्ही शतपावली करा. त्याने तुमच्या शरीरात अन्न जिरेल. तसेच अ‍ॅसिडीटीचा धोका टळेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Sakshi Jadhav

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT