Sick Building Syndrome saam tv
लाईफस्टाईल

AC Side Effects: सतत एसीमध्ये बसून डोकं जड होतं? सावध रहा, शरीरावर होऊ शकतात गंभीर परिणाम

Sick Building Syndrome: एसीमध्ये सतत बसल्याने डोकेदुखी, सायनस आणि डिहायड्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. जाणून घ्या एसीचे दुष्परिणाम आणि त्यापासून बचाव करण्याचे सोपे उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

एप्रिल-मे महिना सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात उकाडा जाणवू लागला आहे. अशा वेळी एसीच्या थंड हवेची झुळूक प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. उकाड्यापासून थोडा आराम मिळावा म्हणून घरी किंवा अगदी कारमध्येदेखील एसी असतो. जर तुम्हीही गरमीला वैतागून एसीचा गारवा घेत असाल, तर सावध व्हा.

आजकाल घर, ऑफिस, मॉल किंवा गाडी सगळीकडे एसीचा वापर वाढला आहे. पण डॉक्टरांच्या मते, सतत एसीमध्ये राहिल्याने 'सिक बिल्डिंग सिंड्रोम'चा धोका वाढू शकतो. यामुळे शरीरावर हळूहळू परिणाम होऊ लागतात.

सतत एसीमध्ये बसण्याचे दुष्परिणाम

एसीची थंड हवा जरी छान वाटत असली तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. अनेकांना एसीमध्ये बसल्यानंतर डोकेदुखी, घसा बसणे, सर्दी-खोकला, त्वचा कोरडी पडणे असे त्रास जाणवतात. सतत कोरड्या आणि थंड हवेत राहिल्याने श्वास घेण्यात अडचण, सायनसचा त्रास आणि मेंदूकडे जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रवाहात बदल होऊन डोकं जड झाल्यासारखं वाटू शकतं.

का होतं अचानक डोकं जड?

डिहायड्रेशन

एसीमुळे खोलीतील आर्द्रता कमी होते आणि हवा कोरडी होते. ही कोरडी हवा शरीरातील ओलावा खेचून घेते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. परिणामी डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

रक्तवाहिन्यांचे आकुंचन

खूप थंड हवेत शरीर स्वतःला उबदार ठेवण्यासाठी रक्तवाहिन्या आकुंचित करतं. यामुळे मेंदूवर ताण येतो आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.

सायनस

थंड आणि कोरडी हवा नाक आणि घशातील म्यूकस मेंब्रेन कोरडी करते. त्यामुळे सायनसचा त्रास होऊन तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होतो.

ऑक्सिजनचा स्तर

बंद खोलीत आणि कमी तापमानात राहिल्याने स्नायूंमध्ये ताण येण्याची शक्यता असते. अशा वेळी डोकं जड झाल्यासारखं वाटू शकतं.

काय उपाय करू शकता?

  • या त्रासांपासून वाचण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • एसीचं तापमान खूप कमी ठेवू नये. हे तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान ठेवणं योग्य ठरतं.

  • एसीमध्ये बसतानाही नियमित पाणी पिणं आवश्यक आहे.

  • सलग जास्त तास एसीमध्ये बसणं टाळावं आणि मध्ये मध्ये बाहेर जाऊन ताजी हवा घ्यावी.

  • एसीचा फिल्टर वेळोवेळी स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना फडणवीसांचा मोठा दणका! बड्या निष्ठावंताने सोडली साथ, 250 कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये करणार प्रवेश

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक आकर्षण, पवना तलावाने वेढलाय 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले, लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून नाव कट झाले? एका मिनिटात असे करा चेक

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT