Sakshi Sunil Jadhav
वजन कमी करताना आणि पोटाचा घेर कमी करताना योग्य डाएट करणं गरजेचं असतं. त्यामध्ये नाचणी की ज्वारी कोणत्या धान्याचा समावेश केला पाहिजे हे पुढील बातमीत आपण जाणून घेणार आहोत.
नाचणी आणि ज्वारी दोन्हीमध्ये कॅलरी कमी असतात. पण ज्वारी थोडी हलकी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.
ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्याने पोट जास्त वेळ भरलेले राहतं आणि सतत भूक लागत नाही.
नाचणी पचनासाठी हलकी आणि सहज पचणारी आहे. ज्यांना पचनाचे त्रास असतील त्यांनी नाचणीचा पर्याय निवडला तर त्यांना फायदा होईल.
नाचणीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. हे शरीराला ताकद देतं आणि डाएट करताना कमजोरी येऊ देत नाही.
ज्वारीमध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे फॅट कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पोटाचा घेर कमी करण्यासाठी ज्वारी जास्त प्रभावी मानली जाते.
ज्वारी खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या कमी होते. नियमित सेवन केल्यास पोट हलके राहते. ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने भूक उशिरा लागते. यामुळे ओव्हरईटिंग टाळता येतं आणि वजन नियंत्रणात राहतं.
वजन कमी करायचे असेल तर ज्वारी अधिक फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी नाचणी योग्य ठरते. दोन्ही धान्ये आपल्या आहारात समतोल प्रमाणात घ्यावीत. ज्वारी दिवसाच्या जेवणात आणि नाचणी नाश्त्यात घेतल्यावर उत्तम परिणाम दिसतो.