South Africa Mysterious Lake Fundudzi Water Secret saam tv
लाईफस्टाईल

Mysterious Story: एक रहस्यमयी तलाव ज्याच्या आतून येतो गूढ आवाज, चुकूनही तलावाचं पाणी प्यायल्यास...!

Mysterious Story: आज आम्ही तुम्हाला एका रहस्यमयी तलावाबद्दल सांगणार आहोत. या तलावाचं पाणी पिणारा कोणताही व्यक्ती जिवंत राहत नाही, असा दावा आहे.

Surabhi Jagdish

आपल्या जगात अनेक रहस्य आहेत. काही रहस्य अशी आहेत, ज्यांचा अजून उलगडा होऊ शकलेला नाही. या रहस्यमयी गोष्टींमध्ये घर, बंगला, खिल्ला किंवा पडीक रूग्णालय यांचा समावेश आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका रहस्यमयी तलावाबद्दल सांगणार आहोत. हे रहस्यमयी तलाव दक्षिण आफ्रिकेमध्ये असून असं मानलं जातं की, या तलावाचं पाणी प्यायल्यास कोणाताही व्यक्ती जीवंत राहत नाही.

लिम्पोपो प्रांतात असलेल्या या तलावाचे नाव फंडूजी असं आहे. फुंडूजी तलावाचं पाणी पिणारा कोणताही व्यक्ती जिवंत राहत नाही, असा दावा आहे. या तलावाचं पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

काय आहे यामागे कहाणी

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, प्राचीन काळात या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी एका कुष्ठरोगीला अन्न आणि राहण्यासाठी जागा देण्याबाबत नकार दिला. त्यानंतर त्याने त्या लोकांना शाप दिला. अशी कहाणी आहे की, त्या व्यक्तीने तलावात प्रवेश केला आणि तो गायब झाला. पहाटेच्या सुमारास या तलावातून विचित्र आवाज येऊ लागले.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या तलावाचं संरक्षण डोंगरावर राहणाऱ्या एका मोठ्या अजगराने केलं होतं. या अजगराला खूश करण्यासाठी दरवर्षी वेंदा आदिवासी समाजातील लोक नृत्य महोत्सवाचे आयोजन करतात. यावेळी एका नदीचा प्रवाह भूस्खलनामुळे थांबला तेव्हा या तलावाची निर्मिती झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

तलावाची गूढ गोष्ट

या तलावाची सर्वात गूढ गोष्ट म्हणजे या तलावाचं पाणी शापित असल्याचं म्हणतात. मुळात सर्वात गूढ गोष्ट म्हणजे, या तलावाचं पाणी पूर्णपणे स्वच्छ आहे. तरीही हे पाणी प्यायल्याने मृत्यू होत असल्याची कथा प्रचलित आहे.

काय आहे पाण्याचं रहस्य?

दरम्यान या पाण्यामध्ये नेमकं कोणतं रहस्य आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संशोधकांना यामध्ये अपयश आलं. असा एक सिद्धांत आहे की, 1946 साली अँडी लेविन नावाच्या व्यक्तीला या तलावाच्या पाण्याचं रहस्य समजलं होतं. त्यावेळी या ठिकाणचं पाणी आणि काही झाडं घेऊन तो निघून गेला. पण अचानक त्याचा रस्ता चुकला. असे त्याच्यासोबत अनेकदा घडले. यानंतर त्याने पाणी आणि रोप फेकून दिलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakhpati Didi Yojana: महिला लखपती होणार! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

Mumbai local update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य-हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

Viral Video: OMG! कूलरमध्ये ८ फूट साप दबा धरुन बसला, घरातल्यांना पळती भुई थोडी, व्हिडीओ व्हायरल

Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

SCROLL FOR NEXT